esakal | नांदेडला पाणीपुरवठा विस्कळीत,आमदार कल्याणकरांचे आयुक्तांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply in nanded

नांदेडला पाणीपुरवठा विस्कळीत,आमदार कल्याणकरांचे आयुक्तांना पत्र

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला (Govdavari River) पूर आला. त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी गढून आणि मातीमिश्रित झाल्यामुळे शहरातील चारही जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (MLA Balaji Kalyankar) यांनी महापालिका आयुक्तांना लेखीपत्र देऊन कळविले आहे. तसेच याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना (Nanded) देखील त्यांनी केल्या आहेत. नांदेड शहरात तीन दिवस जलशुद्धीकरण केंद्र बंद होते. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे विष्णुपुरीत पाणी मातीमिश्रित झाले. हे पाणी शुद्ध करण्यासाठी शुध्दीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात साहित्य लागते.

हेही वाचा: मित्रांची एकाच वेळी एक्झिट, पुलावरुन दुचाकी कोसळून दोघे ठार

त्याचबरोबरच जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुध्द करण्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड होण्याची शक्यता असते. यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्याचा घाट येथील महापालिकेने घातला होता. ऐन सणासुदीच्या काळात महापालिका नेहमीच पाण्यासाठी शहरवासीयांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. श्री गणेशाच्या आगमनालाच महापालिकेने शहरवासीयांचा घसा कोरडा ठेवला आहे. हे केवळ आपत्कालीन परिस्थितीत योग्य नियोजन केले नसल्यामुळे झाले असल्याचे आमदार कल्याणकर यांनी पत्रात नमुद केले आहे. याबाबतचे पत्र देखील आमदार कल्याणकर यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना दिले आहे.

loading image
go to top