esakal | नांदेडला खासदारांच्या निवासस्थानासमोर मराठा आरक्षणासाठी जागर आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - स्वाभिमानी संभाजी बिग्रेड व सकल मराठा समाजातर्फे बुधवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानासमोर जागर आंदोलन करण्यात आले. 

मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार हे जवाबदार आहेत. केंद्र सरकारने सुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्याकारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आरक्षण प्रश्नी लोकसभेत प्रश्न मांडून तो लवकरात लवकर सोडवावा, असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी म्हटले आहे. 

नांदेडला खासदारांच्या निवासस्थानासमोर मराठा आरक्षणासाठी जागर आंदोलन

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आनंदनगर येथील ‘साई सुभाष’ या निवासस्थानासमोर जागर आंदोलन करण्यात आले. 

मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे जवाबदार आहेत. केंद्र सरकारने सुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्याकारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आरक्षण प्रश्नी लोकसभेत प्रश्न मांडून तो लवकरात लवकर सोडवावा, असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा - वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले 

मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन
येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागणीचे निवेदन जागर आंदोलन करून खासदार चिखलीकर यांना देण्यात आले. यावेळी खासदार चिखलीकर यांनी स्वाभिमानीच्या सर्व मागण्या ऐकून येणाऱ्या काळात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक आंदोलनात तसेच मराठा आरक्षण प्रश्नाला भाजपाचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  

सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, डॉ. बालाजी पेनूरकर, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मंगेश पाटील कदम, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम व दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगनुरे यांनी मनोगत व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचलेच पाहिजे - नियमाला मिळाली शिथिलता ‘अन्’ कार्यालये ‘लॉक’ 

यांची होती उपस्थिती
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाला पाटील कदम, हणमंत पाटील वाडेकर, विदर्भ संपर्कप्रमुख शिवाजी जाधव, नांदेड संपर्कप्रमुख बालाजी कऱ्हाळे, विद्यार्थी आघाडी संपर्कप्रमुख वैभव भिसीकर, कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम, महानगराध्यक्ष किरण पाटील गव्हाणे, तालुका संपर्कप्रमुख दत्ता माळेगावे, जिल्हा सचिव संभाजी पाटील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष माधव वडवळे, माधव डाकोरे, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, अभिजीत वरळे, आत्माराम पाटील जोगदंड, तालुका उपाध्यक्ष बजरंग जिगळेकर, चंदू तळेकर, गंगाराम पाटील कदम, योगेश पाटील शिंदे, शिवा पाटील तळेकर, ऋषी पाटील वानखेडे, उमेश घोरबांड, निरंजन कदम, योगेश घोरबांड व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.