तुमच्या हिंदुत्वासाठी धर्माची बदनामी नको - कन्हैयाकुमार

हिंदुत्व मवाळ किंवा कट्टर असे काही नसते. कोणतीही विचारधारा असो, धर्माला बदनाम करु नये. धर्माचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मानवमुक्ती.
Kanhaiya kumar
Kanhaiya kumarsakal
Summary

हिंदुत्व मवाळ किंवा कट्टर असे काही नसते. कोणतीही विचारधारा असो, धर्माला बदनाम करु नये. धर्माचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मानवमुक्ती.

नांदेड - हिंदुत्व मवाळ किंवा कट्टर असे काही नसते. कोणतीही विचारधारा असो, धर्माला बदनाम करु नये. धर्माचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मानवमुक्ती. असे म्हणत, हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्यांना कॉंग्रेसचे कन्हैयाकुमार यांनी विरोधकांना सुनावले.

अर्धापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना कन्हैयाकुमार यांनी भारत जोडो यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले.

कन्हैयाकुमार म्हणाले, विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजाला, जाती, धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा विपरीत परिस्थितीत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्यास निघालेल्या राहुल गांधी यांच्याकडून लोकांच्या आशा, अपेक्षा व विश्वास असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत, असे कन्हैयाकुमार यांनी सांगितले.

महागाईने महिलांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. जिवघेण्या महागाईत जगणे मुश्कील झाले आहे. जनतेच्या या समस्या असताना केंद्रातील भाजपा सरकार मात्र या मुळ मुद्द्यांना हात घालत नाही. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते इतर मुद्द्यांना महत्व देत आहेत. सरकार जनतेचे ऐकत नाही पण राहुल गांधी मात्र जनतेच्या समस्या, वेदना, दुःख ऐकून घेत आहेत. आपले दुःख ऐकण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी आले आहे ही भावनाच जनतेला आपलीशी वाटत आहे. पदयात्रेचा उद्देश केवळ निवडणुका जिंकणे नाही तर जनतेला विश्वास देण्याचा आहे, देशातील एकोपा कायम ठेवणे आहे. आपापसात भांडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसह आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याची लढाई लढली पाहिजे हे जनतेला आता समजले आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com