Mahurgad : परिक्रमा यात्रेसाठी माहूर गडावर भक्तांची मांदियाळी; दत मंदिर, महंतांच्या दर्शनासाठी लागल्या लांबलचक रांगा

ही परिक्रमा यात्रा गुरुवारी पोर्णिमा समाप्तीला संपणार आहे.
Mahurgad
Mahurgadesakal
Updated on
Summary

दत मंदिर व महंत महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

माहूर : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने माहूर गडावर (Mahurgad) श्री दतमंदिर, अनुसया माता मंदिर व श्री रेणुका माता मंदिर (Renuka Temple), देवदेवेश्वर मंदिरासह महाराजांच्या विविध मठ आश्रमात काल हजारो भाविकांनी हजेरी लावली. दत मंदिर व महंत महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

मंगळवारी (ता.२९) ऑगष्ट पासून दोन दिवसीय परिक्रमा यात्रेला सुरुवात झाली आहे. श्रीक्षेत्र माहूर येथील सह्याद्री पर्वत रांगेवर ठिकठिकाणी असलेल्या देवी देवतांचे आणि विविध मठ, आश्रम स्थळीच्या ऋषी मुनीचे दर्शन घेऊन स्थानाभवती प्रदक्षिणा (वेढा) घालण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविकांनी दत्तशिखर, कमंडलुतिर्थ, काळापाणी.

Mahurgad
Highway Accident : आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला! रक्षाबंधन करून परतताना अपघात; सहा वर्षांच्या चिमुरडीसह दाम्पत्य गंभीर

तसेच अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागूण सयामाय टेकडी मातृतिर्थ, सोनापीर दर्गा, पांडव लेणी, देवदेश्वेरी वनदेव, कैलास टेकडी, शेखफरीद बाबा दर्गा, सर्वतिर्थ या मार्गाने सुमारे २२ किलोमीटरचा प्रवास रात्रभर (प्रदक्षिणा) वेढा मारण्यास सुरवात केली आहे. ही परिक्रमा यात्रा गुरुवारी पोर्णिमा समाप्तीला संपणार आहे.

Mahurgad
'भविष्यात दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरा'; मुश्रीफ, केपींविरोधात इचलकरंजीकर का झालेत आक्रमक?

मातृतीर्थ परिसरात श्री रेणुका देवी संस्थान, सागर दुधे, बोधडी येथील युवकांकडून अन्नदान करण्यात येत आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये या करिता तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून चोख व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com