'भविष्यात दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरा'; मुश्रीफ, केपींविरोधात इचलकरंजीकर का झालेत आक्रमक?

राजकीय फायदा मिळावा म्हणून राजकीय नेते चिथावणीखोर भाषणे करताहेत.
Sulkud Water Scheme Hasan Mushrif Former MLA KP Patil
Sulkud Water Scheme Hasan Mushrif Former MLA KP Patilesakal
Updated on: 
Summary

इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने दूधगंगा सुळकूड पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेवरून (Sulkud Water Scheme) चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम राजकीय मंडळी करत आहेत. राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करणाऱ्या वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Sulkud Water Scheme Hasan Mushrif Former MLA KP Patil
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

याबाबतचे निवेदन ‘मी इचलकरंजीकर (Ichalkaranji), एक चळवळ पाण्यासाठी’ या चळवळीकडून अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांना देण्यात आले. इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने दूधगंगा सुळकूड पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, सामान्य लोकांत दंगल घडवून हाणामारी व्हावी, याचा राजकीय फायदा मिळावा म्हणून राजकीय नेते चिथावणीखोर भाषणे करत आहेत.

Sulkud Water Scheme Hasan Mushrif Former MLA KP Patil
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

यात मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी रक्तपात होईल, तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी कर्नाटकमधील नागरिकांना तलवारी घेऊन येण्याचे आवाहन केले. यांना राजकीय मते मिळवण्यासाठी दंगल घडवून सामाजिक वातावरण बिघडवायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sulkud Water Scheme Hasan Mushrif Former MLA KP Patil
सुळकूड पाणी योजनेला आता 'या' गावांचा विरोध; मुश्रीफांसह कृती समितीनं घेतली CM शिंदेंची भेट, तोडगा निघणार?

याची दखल घेऊन या दोन्ही नेत्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात पाणी योजनेवरून दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी केली. अमित कुंभार, उमाकांत दाभोळे, विशाल माळी, मुकुंद तारळेकर, अमोल भोसले, प्रमोद पाटील, सुनील जाधव, रविकिरण हुक्कीरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com