रात्रीस खेळ चाले.. या वाळू तस्करांचा...!

sand
sand

भोकर ः भोकर तालूक्यालगत असलेल्या उमरी, मूदखेड तालुक्यात गोदावरीचे पात्र आहे तर दिवशी (ता.भोकर) गावात सूधा नदी वाहते. येथील वाळू संबंधित होय बा म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना मूठीत ठेवून तस्करी सूरू आहे. लाॅकडाउनचा काळ असल्याने दिवसा कूणी नजर लावेल म्हणून सारा खटाटोप रात्रीलाच उरकून घेतला जातो. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सुरू आहे. येथील महसूल पथक मात्र कुचकामी ठरले आहे. माफीयांना वरदहस्त कूणाचा हे मात्र समजू शकले नाही.


भोकर तालुक्यात सूधानदी सोडली तर एकाही नदीच पात्र विस्तारलेल नाही. मग वाळु तस्करी कशी होईल असा प्रश्न नक्कीच पडतो आहे. एवढ मात्र खरं की तालुक्यालगत असलेल्या उमरी, मूदखेड, राहेर, तालुक्यातून गोदावरी नदीचे पात्र विस्तारलेल आहे. या शिवाय भोकरला कूठेही मोठी नदी नाही. वरील ठिकाणाहून संबंधीत वाळू माफिया चोरी छुपे हजारो ब्रास वाळुची तस्करी करीत आहेत. महसूल विभागाने या माफीयावर करडी नजर ठेवण्यासाठी एक स्वंतत्र पथकाची नियुक्ती केली आहे. शासनाने चारही दिशांना आपलेदूत तैनात केले आहेत. गौणखणीज आणि वाळुची रितसर राॅयल्टी भरूनच वाहतूक करणे बंधनकारक आहे. सदरील वाळु तस्कर सर्व नियम धाब्यावर बसवून आपली मनमानी सुरू केली आहे.संबंधीत अधिकारी गतीरोधक ठरू नयेत, म्हणून माफीयांनी त्यांच्याशी सूत जूळवून आपली चांदी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. नाममात्र कार्यवाही करण्यात येते बाकी सारे आलबेल सूरु असतं, असा प्रकार आता सगळ्याच्या सवयीचा झाल्याचे दिसून येते आहे. परिणामी ठोस कारवाई करण्यात येत नाही.

लाखोचा महसूल पाण्यात
तालूक्यात मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर रस्ता रुंदीकरण व सिमेंट रस्ता, डांबरीकरण, पूलाचे रूंदीकरण अशी विकासकामे सूरू आहेत. यासाठी लागणारा मूरूम, वाळू महसूल विभागाला राॅयल्टी भरूनच घ्यावी लागते. नाममात्र महसूल भरला जातो. कंत्राटदार मात्र यातही काळबेर करून दांडी मारत आहेत.प रिणामी लाखो रुपयांचा महसूल पाण्यात गेल्याचे समजते.

वाळू बनली निशाचर
भोकरलगतच्या उमरी, मूदखेड तालुक्यातून हजारो ब्रास वाळू भोकर शहरातून वाहतूक सूरू आहे. सध्या संचारबंदी लागू असल्याने दिवसा वाहतूक करणे शक्य होत नाही, म्हणून वाळू माफियांनी रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन सर्रास तस्करी सुरू केली आहे. गरजू ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात आहे. दिवशी (ता.भोकर) सूधा नदीतील वाळू विनापरवाना उपसा सुरू आहे. शहरातील आंबेडकर चौकात चोवीस तास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर महसूल विभागाचे स्वतंत्र पथक ठेवले असताना वाळुची वाहने कशी पास होतात निशाचर बनलेल्या वाळुचे रहस्य काय आहे, याचा तपास होणं गरजेचं आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र चिडीचूप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com