नांदेड जिल्ह्यात ओबीसींचे प्रचंड धरणे आंदोलन

प्रल्हाद कांबळे
Thursday, 8 October 2020

नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड : भारतीय पिछडा शोषित संघटन नांदेड व ओबीसी समाज सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धरणे आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गात इतर कोणत्याच जातीचा समावेश करू नये, ओबीसीसाठी निर्माण झालेल्या महाज्योती या संस्थेला तात्काळ एक हजार कोटी रूपये देऊन संस्था कार्यान्वित करावी, महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण पद्धती लागू करावी, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, महाराष्ट्रात मेघा भरती तात्काळ सुरू करून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करावी व ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, यासह इतर माण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.

हेही वाचा - ईपीएस पेन्शनधारकांच्या समस्यांकडे खासदारांचे होतेय दुर्लक्ष -

दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी

तसेच हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी व तसेच दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनही राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

आदींची उपस्थिती

या धरणे आंदोलनात गोविंदराम सुरनर, बालाजी शिंदे, माणिक लोहगावे, गोविंद फेसाटे, ऍड. प्रदीप राठोड, शिवा नरंगले, व्यंकटराव पार्डीकर, प्रकाश राठोड, राजेश चिटकुलवार, राजेश रापते, रामेश्वर गोडसे, रवी बंडेवार, सतीशचंद्र शिंदे, विनोद सुत्रावे, चंद्रकला श्रीमंगले, शोभाराणी चव्हाण, अरूणा पुरी, ललिता कुंभारे, पद्‌मा झंपलवाड, प्रा. साहेबराव बेळे, गोविंद माचनवार, दिगंबर मरकंटे, रामदास पेंडकर, धोंडिबा कळसकर, माधव फुलवळकर, हनमंत तेलंग आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive strike agitation of OBCs in Nanded district