esakal | नांदेड जिल्ह्यात कोरोनावर '४२०' दिवसात ५८ कोटी १६ लाखाचा खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड कोविड खर्च ५८ कोटीचा

नांदेड जिल्ह्यात कोरोनावर '४२०' दिवसात ५८ कोटी १६ लाखाचा खर्च

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते. संबंध यंत्रणा सज्ज होती. मात्त जिल्ह्यात पहिला कोरोनाचा बाधित रुग्ण ता. २२ एप्रिल २०२० रोजी शहराच्या पिरबुऱ्हाननगर भागात आढळून आला होता. त्यानंतर पुन्हा यंत्रणा सतर्क झाली. हा परिसर कन्टेनमेन्ट झोन करुन सर्व परिसर सॅनिटायझ करण्यात आला होता. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निधीची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करुन निधी खेचून आणला. गेल्या ४२० दिवसात जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोना रोग व उपाय योजना यासाठी ५८ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात असून मृत्यूदरही घटला आहे.

उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील शहरापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दक्ष राहण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन व प्रशासनाच्या वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला. ज्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करुन आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

हेही वाचा - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णुपूरी प्रकल्प सध्या स्थिती 92 टक्के भरले आहे.

जिल्हा शासकिय रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, देगलूर, हदगाव, मालेगाव, लोहा, मुखेड, कंधार, माहूर, अर्धापूर, श्यामनगर नांदेड, गोकुंदा किनवट, भोकर, मुदखेड, उमरी, मांडवी, हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, बारड, नायगाव, शासकीय आयुर्वेद रुग्णालय नांदेड आदी ठिकाणी बेड, विलगीकरण कक्ष, पॉझिटिव्ह स्वतंत्र वार्ड, ट्रामा केअर सेंटर, विद्युतीकरण, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, औषधी व यंत्रसामग्री खरेदी, रुग्णालयात अग्निप्रतिबंधक उपाययोजना, सिटीस्कॅन रुम अद्यावत, व्हीलचेअर खरेदी, बाधित रुग्णांसाठी औषधे खरेदी आदींसह खरेदीवर ५१ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील १५४ ठिकाणी कामे होऊन आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

येथे क्लिक करा - नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरुकता दिवस

जिल्हा वार्षिक नियोजनातून सन२०२१- २२ अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी एक कोटी १९ लाख ८१ हजार, मुखेड, हदगाव, कंधार, नायगाव, बिलोली, भोकर येथील आरोग्य यंत्रणेसाठी चार कोटी २१ लाख ७८ हजार, गुरुगोविंदसिंग स्मारक रुग्णालयात २४ लाख ९९ हजायासह जिल्ह्यातील आदी रुग्णालयात मोठा निधी उपल्बध करुन त्यातून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात आली.