Nanded : ७५ वर्षावरील ज्येष्ठांच्या मोफत एसटी प्रवासाला प्रारंभ

महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाचा मोफत बस प्रवास
ST Corporation Free bus travel for 75 years seniors citizens
ST Corporation Free bus travel for 75 years seniors citizens

नांदेड : राज्य शासनाने ता. २३ ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेनुसार राज्यात ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी बस प्रवासाला शुक्रवारपासून (ता. २६ ऑगस्ट) प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २३ ऑगस्ट) महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या मोफत बस प्रवासाचा निर्णय जाहीर केला होता.

त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी एसटी महामंडळाने शुक्रवारपासून सुरू केली असून राज्यातील ७५ वर्षावरील सर्व ज्येष्ठांसाठी एसटीचा प्रवास आता विनामूल्य असेल.

शिंदे - फडणवीस सरकारच्या या निर्णयाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयानंतर आता हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेईल, अशी भावना एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com