नांदेडला मंगळवारी १०८ पॉझिटिव्ह तर २७१ कोरोनामुक्त 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 13 October 2020

गेल्या दोन दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कमी होत आहे तर औषधोपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही समाधानाची बाब आहे त्याचबरोबर उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाणही ८७.४८ टक्के इतके झाले आहे. त्याचबरोबर नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या तीन शासकीय कोविड सेंटरमध्ये २४७ खाटा सध्या उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

नांदेड - नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी तर कोरोनामुक्त संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. १३) २७१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर १०८ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, उपचार सुरू असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी ५० जणांची प्रकृती अतिगंभीर झाली आहे. 

गेल्या दोन दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कमी होत आहे तर औषधोपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही समाधानाची बाब आहे त्याचबरोबर उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाणही ८७.४८ टक्के इतके झाले आहे. त्याचबरोबर नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या तीन शासकीय कोविड सेंटरमध्ये २४७ खाटा सध्या उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा - नांदेडला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके गेली नासून 

दिवसभरात चार जणांचा मृत्यू
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८६१ अहवाल आले. त्यापैकी ७३४ निगेटिव्ह तर १०८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १७ हजार ६०२ एवढी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नाळेश्वर (ता. नांदेड) पुरूष (वय ५४), देऊळगाव (ता. लोहा) पुरूष (वय ८०), चैतापूर (ता. नांदेड) पुरूष (वय ८५) आणि नांदेड हडको महिला (वय ६६) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६१ झाली आहे. 

तीन रुग्णालयात २४७ खाटा उपलब्ध
मंगळवारी आलेल्या १०८ रुग्णांमध्ये नांदेड शहर, नांदेड ग्रामिण, भोकर, मुदखेड, लोहा, देगलूर, बिलोली, कंधार, किनवट, उमरी, मुखेड, नायगाव, अर्धापूर, धर्माबाद, हिंगोली शहराचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय कोविड सेंटरमध्ये ८०, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये ७७ तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये ९० खाटा अशा एकूण २४७ खाटा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे - गंगाखेडच्या दसरा महोत्सवाची सातशे वर्षाची परंपरा होणार खंडित 

नांदेड कोरोना मीटर 

 • एकूण स्वॅब - ९४ हजार ६४४ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ७३ हजार ८०७ 
 • एकूण पॉझिटिव्ह - १७ हजार ६०२ 
 • मंगळवारी पॉझिटिव्ह - १०८ 
 • रुग्णालयातून सुटी - १४ हजार ९०३ 
 • मंगळवारी सुटी - २७१ 
 • एकूण मृत्यू - ४६१ 
 • मंगळवारी मृत्यू - चार 
 • मंगळवारी प्रलंबित स्वॅब - ४७६ 
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरु - दोन हजार १३२ 
 • सध्या अतिगंभीर रुग्ण - ५० 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 108 positive and 271 corona free on Tuesday, Nanded news