नांदेडला मंगळवारी ३४५ पॉझिटिव्ह तर २१३ कोरोनामुक्त

अभय कुळकजाईकर
Tuesday, 15 September 2020

नांदेडला मंगळवारी (ता. १५) सायंकाळी एक हजार ४८५ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ९४० अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ५८ अहवाल आरटीपीसीआर तर २८७ अहवाल ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे आले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या १२ हजार १८२ झाली आहे. दरम्यान, तीन रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.  

नांदेड - सष्टेंबर महिन्यात दररोज तिनशेहून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असून मंगळवारी (ता. १५) ३४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात उपचार सुरु असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपचार सुरु असलेल्या २१४ रुग्णांवर औषधोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

मंगळवारी (ता. १५) सायंकाळी एक हजार ४८५ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ९४० अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ५८ अहवाल आरटीपीसीआर तर २८७ अहवाल ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे आले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या १२ हजार १८२ झाली आहे. दरम्यान, तीन रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून त्यामध्ये हडको नांदेड येथील महिला (वय ७६), कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पुरूष (वय ६४) आणि गवळीपुरा नांदेड येथील पुरूष (वय ८०) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत एकूण मृत्यू संख्या ३२१ झाली आहे.  

हेही वाचा - सगरोळीत शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली 

सात हजार ९०९ रुग्ण बरे
मंगळवारी आलेल्या अहवालामध्ये नांदेड महापालिका, नांदेड ग्रामिण, अर्धापूर, किनवट, बिलोली, हिमायतनगर, मुखेड, धर्माबाद, उमरी, मुदखेड, लोहा, कंधार, भोकर, देगलूर, माहूर, नायगाव, हिंगोली, अदिलाबाद, परभणी आणि हिंगोली येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रुग्णालयातील २१३ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुटी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतची रुग्णांची संख्या सात हजार ९०९ झाली आहे. 

५१ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
सध्या रुग्णालयात तीन हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरु असून अतिगंभीर असलेल्या रुग्णांची संख्या ५१ आहे. तर उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ६७.०३ टक्के आहे. आता प्रलंबित स्वॅब तपासणीची संख्या एक हजार ५९२ असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे - प्लाझ्मा थेरपी अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी वरदान, कशी? ते वाचाच 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण घेतलेले स्वॅब - ६७ हजार १०
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ५१ हजार २८३
 • एकूण पॉझिटिव्ह स्वॅब - १२ हजार १८२
 • आज मंगळवारी पॉझिटिव्ह - ३४५
 • एकूण मृत्यू संख्या - ३२१   
 • आज मंगळवारी मृत्यू - तीन
 • रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या - सात हजार ९०९
 • आज मंगळवारी सुटी दिलेली संख्या - २१३
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - तीन हजार ८८९
 • अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ५१
 • प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - एक हजार ५९२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 345 positive and 213 corona free on Tuesday, Nanded news