esakal | नांदेडला ३६२ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह,  दिवसभरात सहा जणांचा मृत्यू; २०२ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता.चार) एक हजार ३८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९६६ निगेटिव्ह तर ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नांदेडला ३६२ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह,  दिवसभरात सहा जणांचा मृत्यू; २०२ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना बाधितांची आकडेवारी वाढतच चालली असून गुरुवारी (ता. तीन) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता.चार) एक हजार ३८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९६६ निगेटिव्ह तर ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील शहरी भागासह तालुका आणि गावपातळीवर देखील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शुक्रवारच्या अहवालात आरटीपीसीआर टेस्टद्वारे ९४ आणि अँन्टीजन टेस्ट किटद्वारे २६८ असे एकूण ३६२ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार २१२ रुग्ण संख्या झाली आहे. दहा दिवसाच्या औषधोपचारानंतर शुक्रवारी २०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत पाच हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या दोन हजार ६९८ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २७१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचा- नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत ​

२५७ बाधितांचा कोरोनाने बळी

शुक्रवारी मृत्यू झालेल्यांमध्ये विनायकनगर नांदेड पुरुष (वय ६१), विष्णुपुरी नांदेड पुरुष (वय ७०), पिवळी गिरणी नांदेड पुरुष (वय ७२), नाटकर गल्ली देगलूर पुरुष (वय ४६), लोखंडवाडी किनवट पुरुष (वय ५०), गणराज प्लाझा नांदेड पुरुष (वय ५६) या सहा पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५७ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त झाल्याने शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील दोन, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील दहा, पंजाब भवन कोविड सेंटर ५२, मुखेडचे १४, हदगावचे दोन, लोहातील दहा, माहूरचे १२, नायगावचे सात, देगलूरचे सहा, धर्मबादला २३, किनवटला चार, मुदखेडला एक, उमरीत २३, कंधारला २६, बिलोलीला चार या कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयातील सहा असे एकूण २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. ४८८ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु आहे. 

हेही वाचा- Video : नांदेडमध्ये कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थी ‘जेईई’च्या परिक्षेपासून वंचित ​

शुक्रवारी तालुकानिहाय आढळलेले रुग्ण 

नांदेड शहर - १६५, नांदेड ग्रामीण - २६, किनवट - १६, भोकर - पाच, लोहा - १५, नायगाव - २४, उमरी - २०, धर्माबाद - ११, अर्धापूर - दोन, मुखेड - ११, देगलूर - दहा, हिमायतनगर - चार, हदगाव - १६, मुदखेड - चार, बिलोली - दोन, कंधार - सहा, माहूर - १७, यवतमाळ - दोन, हिंगोली - तीन, परभणी - एक, लातूर - दोन असे एकुण ३६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

शुक्रवारी पॉझिटिव्ह - ३६२ 
शुक्रवारी रुग्णालयातून सुटी दिलेले - २०२ 
शुक्रवारी मृत्यू - सहा 
सध्या उपचार सुरु - दोन हजार ६९८ 
प्रकृती गंभीर असलेले - २७१ 
स्वॅब अहवालाची प्रतिक्षा - ४८