Nanded News : मुंबईतील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क

मुंबईतील गोळीबाराच्या दोन घटनेनंतर राज्य शासन आणि विशेष करून गृह विभाग सतर्क झाला आहे.
Crime
Crimesakal

नांदेड - मुंबईतील गोळीबाराच्या दोन घटनेनंतर राज्य शासन आणि विशेष करून गृह विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे राज्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे त्यांची माहिती घेण्यासह तपासणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर पोलीस विभागही ‘अलर्ट मोड’वर असून त्यांचे देखील याबाबत विशेष लक्ष आहे.

मुंबईत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड व इतरांवर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर देखील गोळीबाराची घटना घडली आहे. या दोन प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे अशा व्यक्तीबाबत माहिती घेणे तसेच तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मध्ये ज्यांचे परवाने संपले आहेत किंवा ज्यांच्याकडे परवाने नाहीत, अशा प्रत्येकावर पोलिस विभाग देखील बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची माहिती मिळाली आहे.

त्याचबरोबर शस्त्र परवाना नसताना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यावर गेल्या काही दिवसात नांदेड पोलीसांनी कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसात दोन कारवाया करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात ७२९ जण शस्त्र परवानाधारक

नांदेड जिल्ह्यात सध्या ७२९ जण शस्त्र परवानाधारक आहेत. त्यांच्याकडे पिस्टल, रिव्हॉल्व्हर, गन, रायफल आहे. अजूनही अग्निशस्त्रासाठी १५० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात राजकीय, बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

सध्या १५० प्रस्ताव प्रलंबित असून त्यातील बहुतांश प्रस्ताव कागदपत्रांच्या त्रुटी अभावी प्रलंबित असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे. शस्त्र परवाना देताना शासन नियमानुसार अटी, शर्ती तसेच इतर संबंधित बाबींची शहानिशा करण्यात येत असते. सर्व नियम व कागदपत्राची पुर्तता झाल्यावर शहानिशा करूनच परवाना देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

६२ पिस्टल जप्त

गेल्या वर्षभरात पिस्टल बाळगणाऱ्यांवर ५१ कारवाया करण्यात आल्या. त्यात १४७ आरोपींची धरपकड करण्यात आली. त्यापैकी अग्निशस्त्र कायद्यान्वये १३६ आरोपींना अटक करण्यात आली. ६२ अवैध गावठी पिस्टल जप्त केल्या आहेत तर २४८ जिवंत काडतूस जप्त केले. पकडलेल्या आरोपींकडून १९ लाख ८८, ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com