नांदेड : अर्धापुरात २८ कोटींची पाणीपुरवठा योजना पाण्यात?

पाण्याऐवजी फक्त मिळते हवा : तांत्रिक त्रुटी दूर करून जलस्रोत वाढविण्याची गरज
Nanded Ardhapur water scarcity
Nanded Ardhapur water scarcitysakal

अर्धापूर : शहरातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या पाणी पुरवठा योजनेचे भवितव्य नियोजनाअभावी पाण्यात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेतून २४ तास सात दिवस पाणी पुरवठा करण्यात येईल असे स्वप्न दाखविण्यात आले. पण सध्या तरी काही भागात पाण्याऐवजी फक्त हवाच मिळत आहे. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेऊन शहरातील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित राहण्यासाठी जलस्रोत वाढविण्याची गरज आहे. शहरातील काही भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या नळ योजनेसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येते. साध्या प्रकल्पाचे आवर्तन बंद आहे, निमगाव येथील तलावातील पाण्याने तळ गाठला आहे, शहरातील बोअरवेल पाण्याअभावी व तांत्रिक कारणामुळे बंद पडले आहेत. नगरपंचायत प्रशासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबत आहे, पाणी टंचाई बाबतीत नियोजन शून्य आहे, या अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. वेळीच योजनेच्या त्रुटी दूर करून काम करण्याची गरज आहे.

शहरातील लोकसंख्या ४० हजाराच्या आसपास गेली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता २८ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून काम सुरू करण्यात आले. काम सुरू झाल्यापासून आठरा महिन्यात काम पुर्ण करणे आवश्यक होते. पण गेल्या पाच वर्षात हे काम पूर्ण झाले नाही. या योजनेसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी घेण्यात आले आहे. सुमारे आठ किलोमीटर निमगाव ते अर्धापूर अशी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. शहरातील पाटबंधारे वसाहतीत जलशुध्दीकरण कुंभ, जलकुंभ बांधण्यात आले आहे. शहरातील‌ विविध भागात सुमारे ५४ किलोमीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच विविध भागात जलकुंभ बांधण्यात आले आहे. जलकुंभाची पाणी साठवण क्षमता सुमारे २८ लक्ष लिटर क्षमता आहे.तर शहरातील चार हजार कुटुंबांना नळजोडणीचे उदिष्ट आहे.

शहरातील पाझर तलावातील गाळ काढून नियोजन पद्धतीने सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी २८ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली आहे .ही योजना कार्यान्वित झाली असून काही तांत्रिक त्रुटी दूर करून पाणीपुरवठा करण्यात येईल.

- छत्रपती कानोडे, नगराध्यक्ष.

नगरपंचायत, ठेकेदार आणि सल्लागार अभियंता एकमेकांना दोषी ठरवून आपलीं जबाबदारी टाळत आहेत.याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.परिस्थिती सुधारली नाही तर जलाक्रोश मोर्चा काढण्यात येईल.

- बाबुराव लंगडे, भाजप गटनेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com