esakal | Nanded: तिसऱ्या फेरीपूर्वीच ‘बीए’ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

 admission

नांदेड : तिसऱ्या फेरीपूर्वीच ‘बीए’ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोविड- १९ नंतर पहिल्यांदा महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. महाविद्यालय प्रशासन, विद्यार्थी व पालकांनी देखील आनंद व्यक्त केला. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांनी पहिले दोन राऊंड पूर्ण झाले तरी, अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केला नव्हते. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला देखील बीएचा कोटा पूर्ण होईल की नाही अशी चिंता सतावत होती. मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये राऊंड पूर्ण होण्यापूर्वीच सर्वच्या सर्व जागेवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे आज-उद्या प्रवेश घेऊ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होताना दिसत आहे.

पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रवेश न घेतलेल्या अनेक विद्यार्थी आज सर मी आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मला प्रवेश द्या अशी विनवनी महाविद्यालय प्रशासनाकडे करावी लागत आहे. दुसरीकडे बीए करण्यासाठी ग्रामीण भागातुन आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मात्र पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित केला आहे. मात्र शहरातील विद्यार्थी बी.ए.च्या प्रवेशापासून वंचित राहताना दिसून येत आहेत. त्यासाठी त्यांना संस्थाचालक किंवा इतर ओळखीच्या व्यक्तींच्या शिफारशी घेऊन ते महाविद्यालयातील प्राचार्याकडे प्रवेशासाठी विनवनी करत आहेत.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

असे असले तरी, विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रवेश मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही. ही महाविद्यालय प्रशासनासमोरील सर्वात मोठी अडचण आहे. विद्यापीठाचा नियम डावलुन प्रवेश दिल्यास त्या महाविद्यालयास पाच हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो. परंतु विद्यापीठाकडुन अद्याप वाढीव जागेसाठी सिग्नल मिळाले नाही. त्यामुळे बी.ए.च्या विविध शाखांसाठीच्या सर्व महाविद्यालयातील रिक्त जागा पूर्ण भरल्या जाणार नाहीत तो पर्यंत महाविद्यालयास वाढिव जागा मिळणार नसल्याचे समजते.

असाही विरोधाभास

एकीकडे शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे त्या महाविद्यालयाचे राऊंड पूर्ण होण्याआगोदरच कोटा पूर्ण झाला आहे. दुसरीकडे अनेक महाविद्यालयात बी.ए. प्रवेशासाठी विविध शाखेला प्रवेश घेण्यासाठी साधे कुणी विचारपूस देखील करत नाही. त्यामुळे कोटा पूर्ण झालेल्या महाविद्यालयास वाढिव जागा देण्यासाठी रिक्त जागा असलेल्या महाविज्यालयाचा विरोध होत आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

पहिल्या दोन राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले नव्हते. ही महाविद्यालयात प्रशासनासाठी नवीन गोष्ट नाही. परंतु तिसऱ्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी एकच घाई केली. त्यामुळे जागा पुर्ण भरल्या आहेत. प्रवेशासाठी आजही अर्ज येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून वाढिव जागेची मागणी करण्यात येत आहे. ती कधी पूर्ण होईल निश्चित सांगता येत नाही.

- आर. एम. जाधव, प्राचार्य, पीपल्स महाविद्यालय

loading image
go to top