नांदेड : भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा- गुणवंत मिसलवाड

प्रल्हाद कांबळे
Friday, 27 November 2020

ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे २६ नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी वाजता कोव्हिड-१९ चे शासन नियम पाळून नांदेड आगार कर्मचार्‍यांच्यावतीने ७१ व्या संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

नांदेड- जगातील २४३ देशांच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ असून भारतातील तळागाळातील माणसासाठी विकासात्मकदृष्ट्या भारतीय संविधान हे एकसंघ व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देशाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन गुणवंत मिसलवाड यांनी केले.

ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे २६ नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी वाजता कोव्हिड- १९ चे शासन नियम पाळून नांदेड आगार कर्मचार्‍यांच्यावतीने ७१ व्या संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, संविधान हे जगात महान ग्रंथ असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे देशाला खूप मोठी देण असून आपण युवापिढीसहीत सर्वांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संविधानाचा आदर्श आत्मसात करुन सामाजिक कार्य करण्याची आधुनिक काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करुन राज्यघटनेवर प्रकाश टाकला. सर्वप्रथम २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संविधान फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विभाग नियंत्रक अविनाश कचरे , विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे, कामगार नेते  गणेश कांबळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संदीप गादेवाड राजकुमार टिपराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री. गुणवंत एच. मिसलवाड, रघुनाथ वाघमारे, अनिल आत्रे, बाबासाहेब चिंतोरे, अशोक कांबळे, सुभाष लांडगे यांनी सर्व मान्यवरांचा हृदय सत्कार केला. रमेश गजभारे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन सर्वांना प्रतिज्ञा दिली

.
यावेळी गणेश कांबळे, बाबासाहेब चिंतोरे, अशोक कांबळे, अविनाश कचरे पाटील यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले. ते आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नितीन मांजरमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेश गहीरवार, संजय गजभारे, संदीप धनसडे, सखाराम कांबळे, विनोद हतागळे, राजेश कांबळे, हरी वरळे, गौतम कांबळे, भगतसिंघ सिद्धू, मनोहर माळगे, आश्‍लेष कांबळे, गिरीश कुलकर्णी, रमेश आन्येबोईनवाड, उत्तम कांबळे, राजू घंटे, सखाराम कांबळे, प्रमोद रत्नपारखी इत्यादींनी सहकार्य केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The Constitution of India is the soul of India Gunwant Misalwad nanded news