Nanded News: कोरोनाच्या आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम; जिल्ह्यातील बारा रुग्णालयात रंगीत तालीम

जगभर कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात
Nanded News
Nanded Newssakal

नांदेड : जगभर कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा आज मंगळवारी (ता. २७) रंगीत तालमीमध्ये तपासून घेण्यात आली. भविष्यात गरज जर भासलीच तर त्यात कोणतीच त्रुटी असता कामा नये, यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.(Nanded News)

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्ह्यातील आरोग्य सेवा - सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व साधन व सेवा - सुविधांची रंगीत तालीम घेऊन पूर्व तयारी केली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात वैद्यकीयदृष्ट्या मुबलक प्रमाणात सेवा, सुविधा उपलब्ध आहेत.

मागील कोविडच्या लाटेत सर्वाधिक ३५ मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजनची मागणी गेली होती. त्यावेळेसच्या मागणीच्या तीनपट पेक्षा अधिक आता जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता झाली आहे. सद्य स्थितीत १७८.९९ मेट्रिक टन ऑक्सिजन सुविधा आहे. यात आणखी ४५.८२ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता वाढविली जात आहे.

जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयामध्ये सुमारे एक हजार १९० खाटा अर्थात बेडस् सुविधा आहे. मागील कोविड लाटेत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडसची संख्या चार हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे २५० व्हेंटीलेटरची सुविधा आहे. टेस्टींग किटस् मुबलक प्रमाणात आहेत. मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर केंद्र साकारले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ६८ रुग्णवाहिका तर शासकीय रुग्णालयाकडे इतर ३६ रुग्णवाहिका असा एकुण १०७ रुग्णवाहिका प्रत्येक ठिकाणी तयार आहेत. त्याचबरोबर इतर २५ रुग्णवाहिका जिल्ह्यात तत्पर असल्याची माहिती देण्यात आली.

मास्क वापरणे अधिक सुरक्षित

जिल्हा प्रशासनाने कोविडच्यादृष्टिने पूर्व तयारी केलेली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com