नांदेड - कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ 

file Photo
file Photo

नांदेड - मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असल्याने बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्यावर स्थिर होते. मात्र रविवारी (ता.१७) प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार ३४ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. याचबरोबर उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ४० रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांचे प्रमाण एक टक्यांनी वाढले आहे. 

रविवारी (ता.१७) ५१७ अहवालापैकी ४७८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २२ हजार ७६ एवढी झाली असून यातील २० हजार ९६३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण ३३२ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यातील ५७९ व्यक्तींनी प्राण गमवले आहेत. 

४० बाधित रुग्ण बरे झाल्याने सुटी

रविवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चार, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल सहा, धर्माबाद एक, देगलूर एक, लोहा एक, कंधार ११, खासगी रुग्णालय पाच असे ४० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. 

तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४९ रुग्ण

रविवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २०, हदगाव एक, मुदखेड एक, किनवट एक, मुखेड पाच, बिलोली सहा असे ३४ बाधित आढळले. जिल्ह्यात ३३२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २३, जिल्हा रुग्णालय २४, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) १९, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १३९, मुखेड ११, हदगाव एक, महसूल ३०, किनवट तीन, देगलूर सहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४९, खासगी रुग्णालय २७ आहेत. 

नांदेड कोरोना मीटर -

एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या- २२ हजार ७६ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २० हजार ९६३ 
एकूण मृत्यू संख्या-५७९ 
रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३४ 
रविवारी कोरोनामुक्त रुग्ण - ४० 
मृत्यू - शुन्य 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com