esakal | नांदेडला दिलासा! दिवसभरात सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नांदेडला दिलासा! दिवसभरात सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरामध्ये (Corona In Nanded) तीन ते साडेतीन टक्के कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. शनिवारी (ता. २४) प्राप्त झालेल्या ८९१ अहवालापैकी ८८३ निगेटिव्ह, तर सहा जणांचे अहवाल नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात सात जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या ४७ रुग्ण उपचार घेत असून यात पाच बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात (Nanded) आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १४२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार ६५६ वर स्थिर आहे. (nanded corona updates six people covid positive glp88)

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाज, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शनिवारी बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात - दोन, नांदेड ग्रामीण- एक, कंधार- एक, नायगाव - एक, अर्धापूर -एक असे एकूण सहा बाधित आढळले. सात कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. यात महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - दोन व मुखेड- पाच असे एकूण सात व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या ४७ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: चिरमुड्या भाऊ-बहिणीचा गुदमरुन मृत्यू, आईवडीलांवर उपचार सुरु

नांदेड कोरोना मीटर :

एकूण कोरोनाबाधित : ९० हजार १४२

एकूण बरे : ८७ हजार ४३९

एकूण मृत्यू : दोन हजार ६५६

शनिवारी कोरोनाबाधित : सहा

शनिवारी बरे : सात

शनिवारी मृत्यू : शुन्य

उपचार सुरु : ४७

अतिगंभीर प्रकृती : पाच

loading image
go to top