नांदेड - कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्क्यापेक्षा अधिक 

शिवचरण वावळे
Sunday, 24 January 2021

रविवारी (ता.२४) एक हजार ७७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक हजार ७४८ अहवाल निगेटिव्ह, दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड - कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक कमी होत आहे. दुसरीकडे गंभीर आजारी कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्यापेक्षा अधिक झाल्याचे दिसून येते. शिवाय दोन दिवासांपासून एकही गंभीर रुग्ण दगावला नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा ५८२ वर स्थिर आहे. 

शनिवारी (ता.२३) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता.२४) एक हजार ७७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक हजार ७४८ अहवाल निगेटिव्ह, दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २२ हजार २६४ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेडच्या कामेश्वरने दिल्लीच्या तख्तावर नाव कोरले; प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कारासाठी निवड- आमदार श्यामसुंदर शिंदे ​

आतापर्यंत २१ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त 

रविवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - दोन, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण कक्षातील - सात, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - चार, माहूर - एक, मुखेड- दोन व खासगी रुग्णालय - चार असे २० बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्हाभरातील आतापर्यंत २१ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- आईनं जगाचा निरोप घेतला; धक्का सहन न झाल्यानं मुलाचाही मृत्यू ​

रविवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅबची तपासणी सुरु 

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील सात, नांदेड ग्रामीण - एक, किनवट एक व परभणी एक असे दहा कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. सध्या ३२० बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 
विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - १७, जिल्हा शासकीय रुग्णालय - १९, जिल्हा शासकीय रुग्णालय नवीन इमारत - १६, महसूल भवन कोविड केअर सेंटर - आठ, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण - १८५, मुखेड - १२, किनवट - दोन, देगलूर - चार, तालुकांतर्गत गहविलगीकरण कक्षात - ३९ व खासगी रुग्णालयात - १८ असे जिल्हा भरातील शासकीव, खासगी व घरी राहुन उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३२० इतकी आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - एक हजार ७७२ 
एकूण कोरोनामुक्त- २१ हजार १५९ 
एकूण मृत्यू- ५८२ 
रविवारी पॉझिटिव्ह - दहा 
रविवारी कोरोनामुक्त - २० 
रविवारी मृत्यू - शुन्य 
उपचार सुरु -३२० 
गंभीर रुग्ण - आठ 
स्वॅबतपासणी सुरु - ३९६ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Coronation rate is more than 95 percent Nanded News