अर्धापुरात दगड, काठीने मारहाण करुन पत्नीचा खून; पतीला अटक

अर्धापुरात दगड, काठीने मारहाण करुन पत्नीचा खून; पतीला अटक
Summary

पती केदरनाध बुलबुले याच्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अर्धापूर (जि.नांदेड) : आमराबाद तांडा (ता.अर्धापूर) Ardhapur येथे सालगड्याने आपल्या पत्नीचा दगड, काठीने मारहाण करून खुन केल्याची घटना बुधवारी (ता.२३) पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पतीविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात Ardhapur Police Station सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की केदरनाध तुकाराम बुलबुले (वय ३५ )हे अश्विन पवार यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी वेदिका बुलबुले यांच्यात सतत वाद, भांडण होत असत. पती केदरनाध यांनी आपल्या पत्नीला वडील ज्या आखाड्यावर सालगडी राहत होते, तेथून आपल्या आखड्यावर आणले होते. दोघा पतीपत्नीमध्ये बुधवारी पहाटे वाद झाला. nanded crime news husband killed wife with stone, stick in ardhapur

अर्धापुरात दगड, काठीने मारहाण करुन पत्नीचा खून; पतीला अटक
'एमआयएम'चा पहिला महापौर औरंगाबादमधून, इम्तियाज जलीलांना विश्वास

पतीने आपल्या पत्नीला दगड, काठीने तोंडावर मारहाण केली. यातच पत्नीचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मारोती गिरे यांनी दिली. यावरुन पती केदरनाध बुलबुले याच्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीस अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com