नांदेड : प्लाझ्मा दानाची प्रसार यंत्रणा मंदावली, जिल्ह्यात फक्त एवढे प्लाझ्मा दान

प्रल्हाद कांबळे
Saturday, 15 August 2020

मात्र यावर प्रतिबंध करण्यासाठी कोरोना बाधा झालेल्या व्यक्तींची शक्ती वाढविणे किंवा त्या व्यक्तीला प्लाझ्मानुसार जीवदान देता येते. मात्र जिल्ह्यात प्लाझ्मा दानाचे महत्व कोरोनावर विजय मिळविलेल्या रुग्णांना पटवून देणे आरोग्य विभागाला  सध्या तरी यश आले नसल्याचे दिसुन येते.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व मृतांची संख्या पाहता येणाऱ्या काळासाठी ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोना बाधीत झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हेच सध्या आपल्या हाती आहे. सध्या जगभरात कुठेच यावर लस मिळाली नाही. मात्र यावर प्रतिबंध करण्यासाठी कोरोना बाधा झालेल्या व्यक्तींची शक्ती वाढविणे किंवा त्या व्यक्तीला प्लाझ्मानुसार जीवदान देता येते. मात्र जिल्ह्यात प्लाझ्मा दानाचे महत्व कोरोनावर विजय मिळविलेल्या रुग्णांना पटवून देणे आरोग्य विभागाला  सध्या तरी यश आले नसल्याचे दिसुन येते. दोन हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले, मात्र प्लाझ्मा दान फक्त सोळा जणांनी केले आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोना यौध्यांनी पुढे यावे अशे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातून दोन हजार कोरोना मुक्तपैकी केवळ सोळा जणांनी केला प्लाझ्मा दान केले आहे. आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष की प्लाझ्मा दाते सापडेनात यावर न बोलले बरे. कोरोना बाधित रुग्णावर प्लाजमा थेरपीनुसार उपचार करण्याची पद्धत सर्वत्र वापरली जात आहे. या पद्धतीने उपचार केल्याने त्याचा रुग्णांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत असले तरी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा उपलब्ध होणे आवश्यक आहे. नेमकी हीच प्रक्रिया नांदेड जिल्ह्यात मंदावली आहे. 

हेही वाचानांदेडला पुन्हा ११६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

लाॅकडाऊनसारखे उपाय योजण्यात आले आहेत

आतापर्यंत दोन हजार १२७ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले. त्यापैकी केवळ सोळा जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. त्यामुळे कोरोना मुक्त रुग्णांचे समुपदेशन करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गावर उपचारक ठरणारी लस सध्या बाजारात उपलब्ध झालेली नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि गंभीर रुग्णांना लाईफ सपोर्टवर ठेवणे इतकेच काय ते आपल्या हाती आहे. त्यामुळे लाॅकडाऊन सारखे उपाय योजण्यात आले आहेत. शारिरीक अंतर पाळणे किंवा म्स्क वापरणे याचे महत्व त्यामुळे वाढले असले तरी कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी महत्त्वाची ठरत आहे. भारतासह जगात सर्वत्र ही पद्धत गंभीर स्वरूप धारण केलेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी वापरली जात आहे. या उपचार पद्धतीला सर्वत्र मान्यता देण्यात आली असून कोरणा मुक्त झालेला कोणताही व्यक्ती ठराविक कालावधीनंतर प्लाझ्मा दान करु शकतो. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविता येणार आहेत. परंतु नेमकी हीच प्रक्रिया नांदेड जिल्ह्यात थंडावली आहे.

येथे क्लिक करा नांदेड : अर्धापूर येथील नगरपंचायतमधील दोघेजण लाचेच्या जाळ्यात

नांदेडात ही मोहीम अत्यंत संथपणे सुरु

प्लाझ्मा दान केल्यानंतर त्या दात्याला अशक्तपणा येत नाही, किंवा त्यावर त्याचे काही परिणाम होत नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर ही प्रक्रिया स्थानिक स्तरावर का मंदावली अशी विचारणा होऊ लागली आहे. देशाच्या अनेक शहरात प्लाझ्मा सेंटर उघडण्यात आली आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती सुद्धा केली जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने प्लाझ्मा दान करावे असे आवाहनही राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर वारंवार केले जात आहे. मात्र नांदेडात ही मोहीम अत्यंत संथपणे सुरु असल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणा प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून देण्यात कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Dissemination of plasma donations slowed down, only 16 plasma donations in the district nanded news