नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded district Municipal Nagar Panchayat election soon

नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू

नांदेड : जिल्ह्यातील १० नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली असून ता.१० ते ता.१४ मे या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही ता.१० मार्च २०२२ रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरु करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरु केली आहे.

जिल्ह्यातील भोकर, हदगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, कंधार, मुखेड, मुदखेड, बिलोली आणि कुंडलवाडी या दहा नगरपालिका व हिमायतनगर नगरपंचायतीची मुदत संपल्याने प्रभाग रचनेवर आक्षेप मागवण्याचा कार्यक्रम जो पूर्वीच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आला होता. तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा सुरु केला आहे.

या स्थानिक संस्थांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ता.१० ते ता.१४ मे या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २३ मे पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप १० मार्च २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार १० ते १४ मार्च दरम्यान प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर एकत्रित सुनावणी होईल. हरकती व सूचनांबाबत ३० मेपर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. अंतिम प्रभाग रचना सात जून २०२२ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Nanded District Municipal Nagar Panchayat Election Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top