नांदेड : अर्धापुरात डीपी बंदमुळे पिके धोक्यात, पेरण्या रखडल्या. देळूब तीन महिण्यापासून अंधारात

लक्ष्मीकांत मुळे
Wednesday, 9 December 2020

आमची शेती मुलभुत सुविधा पासून वंचित आहोत, आमची शेती कशी सुधारेल आशा प्रतिक्रिया शेतक-यातून व्यक्त केल्या जात आहेत. देशभरात शेतकरी आंदोलनाने पेट घेतला असतांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील गावात मात्र विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शेतकरी आंदोलन देशभर गाजत आसतांना पालकमंत्र्याच्या मतदार संघातील गावात मात्र अंधार निर्माण झाला आहे. शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून शेतीचे आठ ते दहा डीपी बंद आहेत. तर देळूब बुद्रूक येथे गेल्या तीन महिण्यापासून अंधारात रात्रा काढाव्या लागत आहे. शेतीच्या डीपी बंद आसल्यामुळे पिकांना पाणी देणे, खरिपाच्या पेरण्या आदी कामे बंद पडली आहेत.

आमची शेती मुलभुत सुविधा पासून वंचित आहोत, आमची शेती कशी सुधारेल आशा प्रतिक्रिया शेतक-यातून व्यक्त केल्या जात आहेत. देशभरात शेतकरी आंदोलनाने पेट घेतला असतांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील गावात मात्र विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील डीपी गेल्या 20 ते 25 दिवसापासून बंद आहेत. यासाठी शेतकरी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहे. याचा परिणाम खरिपाच्या पेरण्या , पिकांना बसत आहे.विहीरित पाणी असून सुध्दा पिकांना देता येत नाही.

हेही वाचा -  हिंगोली : वधू पित्याकडून वधूस आंदण म्हणून दिली ३१ फळझाडांची भेट, तेलगावच्या राऊत परिवाराचा उपक्रम

तालुक्यात आठ ते दहा डीपी बंद आहेत.डीपी बंद झाल्यावर शेतक-यांनाच काढून जमा करावा लागतो, डिपी पुन्हा बसविण्यासाठी शेतक-यांना पुढाकार घ्यावा लागतो. विजवितरण कंपणीचे अधिकारी शेतक-यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच कार्यालयात चकरा माराव्या लागतात आशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

देळूब येथे अनियमित विजपुरवठा गेल्या तीन महिण्यापासून सुरू आहे गावातील तीन फेज व एक फेज डीपी  नादुरूस्त आसतात. जवळच्या डीपीवरून विज पुरवठा घ्यावा लागतो.नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. या बाबत विजवितरण कंपनीच्या अधिका-यांना वारंवार माहिती देवूनही  काम केले जात नाही आशी प्रतिक्रिया माजी सभापती बाबुराव हेंद्रे पाटील यांनी दिली. तालुक्यातील नादुरूस्त डीपी दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. क्रमवारी नुसार डीपी देण्यात येत आहेत.आशी माहिती उपअभियंता कादरी यांनी दिली.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: DP closure in Ardhapur threatens crops, sowing stalled nanded news