Nanded: अर्धापूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर नगरपंचायत

नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

अर्धापूर : आगामी काळात होणाऱ्या अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून नगरपंचायतीच्या वार्ड रचना व आरक्षण सोडत शुक्रवारी (ता.१२) काढण्यात आले आहे. नव्याने घोषित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतचा काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे, तर काहींना संधी उपलब्ध झाली आहे. तर काही वार्डाचे आरक्षण जैसे थे राहिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर मी पुन्हा येईल म्हणनाऱ्यांचे स्वप्न भंगले असले तरी त्यांना सुरक्षित वार्ड शोधवा लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष पप्पु बेग, विरोधी पक्षनेते किशोर देशमुख, गाजी काजी, मुक्तेदर पठाण यांचे वार्ड राखीव झाले आहेत, नासेर खान पठाण, निलोफर इम्रान य सिद्दिकी यांच्या वार्डचे आरक्षण जैसे थे राहिल्याने यांना दिलास मिळाला आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. वार्ड रचना व आरक्षण सोडत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तहसीलदार उज्वला पांगारकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी‌ आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली. त्यांना कार्यालयीन अधीक्षक मदन डाके, अभियंता नागनाथ देशमुख, अनिल मोरे, विजय गंधनवाड यांनी सहकार्य केले.

नगरपंचायतमध्ये १७ वार्ड असून नऊ वार्ड हे महीला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षण पुढील आहे. अनुसचित जाती महिला प्रवर्गसाठी १४, अनुसुचीत प्रवर्गसाठी जातीसाठी १७ वार्ड राखीव. ओबीसी प्रवर्गासाठी एक, सात, ओबीसी महिला प्रवर्गसाठी नऊ, १५,१६, राखीव, खूला महिला प्रवर्गसाठी चार, पाच, सहा, ११, १२, राखीव झाले आहेत. तर खुल्या प्रवर्गसाठी दोन, तीन, आठ दहा, १३ राहणार आहेत.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

आरक्षण सोडतवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, शेख लायक, डॉ. विशाल लंगडे, आर. आर. देशमुख, प्रवीण देशमुख, अशोक डांगे, गाजी काजी, उमेश सरोदे, नामदेव सरोदे, ओमप्रकाश पत्रे, इम्रान सिद्दिकी, महमंद सूलतान, दिलीप डाढळे, राहुल हाट्टेकर, आदी उपस्थित होते.

loading image
go to top