नांदेड : रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज तीन फेस्टिवल विशेष गाड्या धावणार 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 17 October 2020

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता अनेक मार्गावर आता रेल्वे सुरू होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांनाही रेल्वेचा लाभ घेता यावा या अनुषंगाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.

नांदेड : येणाऱ्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासन प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा आणि नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी तीन फेस्टिवल विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. यासाठी स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता अनेक मार्गावर आता रेल्वे सुरू होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांनाही रेल्वेचा लाभ घेता यावा या अनुषंगाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. अशाच पाठपुराव्याने गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडहून मुंबईसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली. आता या सणासुदीच्या अनुषंगाने प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाता- येता यावे यासाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. 

हेही वाचानांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर -

याप्रमाणे धावणार रेल्वे गाड्या

तीन विशेष फेस्टिवल रेल्वे गाड्या लवकरच मराठवाडा विभागातून धावणार आहेत. या गाडी क्रमांक १२७६५ ही द्विसाप्ताहिक तिरुपती- अमरावती गाडी ता. २० ऑक्टोबर ते ता. २८ नोव्हेंबर या काळात दर मंगळवार आणि शनिवारी धावेल. गाडी संख्या १२७६६ अमरावती- तिरुपती ही द्विसाप्ताहिक तिरुपती गुरुवार आणि सोमवार ता. २२ ऑक्‍टोबर ते ता. ३० नोव्हेंबर या काळात गाडी संख्या ०२७२० द्विसाप्ताहिक हैदराबाद- जयपूर सोमवार आणि बुधवार ता. २१ ते ता. २५ नोव्हेंबर या कालावधीत तर गाडी संख्या ०२७१९ द्विसाप्ताहिक जयपुर- हैदराबाद परतीच्या प्रवासात बुधवार आणि शुक्रवार ता. २३ ऑक्टोबर ते ता.२७ नोव्हेंबर या काळात धावणार आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : नवरात्रोत्सवात ना दांडीया, ना सार्वजनिक कार्यक्रम, भक्तात नाराजगी -

रेल्वे प्रवाशांनी या रेल्वेगाड्यांच्या लाभ घ्यावा 

शिवाय गाडी संख्या ०७६१० द्विसाप्ताहिक पूर्णा- पटना शुक्रवार ता. २३ ऑक्टोंबर ते ता. २७ नोव्हेंबर आणि परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७६०९ द्विसाप्ताहिक पटना- पूर्णा रविवार ता. २५ ऑक्टोंबर ते ता. २९ नोव्हेंबर या काळात होणार आहे. प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार यांनी कोवीड संसर्ग संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. रेल्वे प्रवाशांनी या रेल्वेगाड्यांच्या लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Good News Three Festival special trains will run for railway passengers nanded news