
तामसा (जि. नांदेड) : येथील एका दहावीच्या वर्गातील आदिवासी विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार करून गर्भपात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध बुधवारी (ता. १२) पहाटे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.