esakal | नांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

file photo
वळण रस्त्यासाठी ओलिताखील जमिनीसाठी चौपट मावेजा तर एकाच गटातील रेल्वेसाठी मात्र कोरडवाहूसाठी मावेजा देण्यात आल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे

नांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूरातील एकाच शिवारातील वळण रस्त्यासाठी ओलिताखील जमिनीसाठी चौपट मावेजा तर एकाच गटातील रेल्वेसाठी मात्र कोरडवाहूसाठी मावेजा देण्यात आल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण,जिल्हाधिकारी ,भूसंपादन अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.वेळोवेळी गोड बोलून वेळी मारून नेली.प्रत्यक्षात मात्र जेव्हा मावेजा घोषित झाला तेंव्हा प्रशासनाने गोड बोलून गळा कापला आशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

अर्धापूर तालुक्यातून 361 हा राष्ट्रीय महामार्ग जात असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अर्धापूर शिवारातील संपादित करण्यात येणा-या जमिणीसाठी जादा मावेजा मिळाण्यासाठी शेतक-यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण व प्रशासनाकडे  पाठपुरावा करण्यात आला .यात यश आले असून ओलीताच्या दुप्पट भाव मिळणार आहे.पण त्याच वेळेस मात्र रेल्वेसाठी संपादित करण्यात येणा-या जमिणीसाठी कोरडवाहू प्रमाणे मावेजा मिळणार आसल्यामुळे शेतक-यांत खुप मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा नांदेड : लोकमान्य टिळक निर्माल्य स्वच्छता अभियानात कृतीयुक्त सहभाग नोंदवा- मिलिंद देशमुख -

एकाच गटातील व ओलिताखाली आसलेल्या जमिनीसाठी दोन नियम

अर्धापूर तालुक्यातून नांदेड यवतमाळ वर्धा हा रेल्वे मार्ग जात आहे.या मार्गासाठी तालुक्यातील जमीन संपादित करण्यात आली असून अर्धापूर शिवारातील जमिण संपादित करून मावेजा देण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे.या रेल्वेच्या मार्गासाठी शेतक-यांना कोरडवाहू शेती प्रमाणे मावेजा मिळणार आसल्यामुळे शेतक-यातून तिव्र प्रतीक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.एकाच शिवारातील,एकाच गटातील व ओलिताखाली आसलेल्या जमिनीसाठी दोन नियम कसे लागू होतात आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमची प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गोड बोलून फसवणूक केली आहे आशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे 

अधिकाऱ्यांनी करायचे तेच केले

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला रेल्वेसाठी देण्यात येणा-या मावेजाकडे लक्ष देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिका-यांना दिला होत्या.अधिका-यांनी नेहमीप्रमाणे मान हालवून होय सर , लक्ष घालतो, मला भेटा असे ठेवणीतील उत्तरे देवून वेळ मारून नेली. पण करायचे तेच केले.

येथे क्लिक करा नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर

शेतक-यांची घोर फसवणुक 

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे हे केंद्र शासनाच्या आखातारितील विभाग आहेत.या दोन्ही विभागासाठी आमची जमीन संपादित करण्यात आली आहे.एकाच गटातील जमिनीला रस्तासाठी जादा भाव तर रेल्वेसाठी कमी भाव आसे चुकीचे काम भूसंपादन अधिका-यांनी केले आहे.आम्ही पाठपुरावा केला .पण गोड बोलून आमची फसवणूक करण्यात आली आहे.माझ्या जमिला दोन भाव मिळत आहेत.या फसवणुकीकडे पालकमंत्र्यानी लक्ष घालावे आशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे