नांदेड : जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग साहित्याच्या प्रतिक्षेत- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 25 November 2020

गतवर्षी मोठा गाजावाजा करत आयोजीत केलेल्या साहित्य शिबिरातील साहित्य व उपकरणे वाटपाचा जिल्हा प्रशासनालाच विसर 

नांदेड :  नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६ ही तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी लाखों रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अद्याप हे साहित्य व उपकरणे वाटप केले नसल्याने दिव्यांगावर हा अन्याय असल्याचा आरोप राहूल साळवे यांनी केला आहे. 

 सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या पुढाकारातून ता. १० डिसेंबर २०१९ ते ता. २६ डिसेंबर २०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६ ही तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी लाखों रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली होती

तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली होती परंतु मार्च महिण्यातच कोरोना महामारीमुळे टप्याटप्याने लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला होता. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची ही बदली झाल्यामुळे तसेच वाटपाचा कार्यकाळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटणकर यांची भेट घेऊन हे साहित्य त्वरीत वाटप करावे अशी मागणी केली.

जागतिक दिव्यांग दिनी वाटप करावे

यावेळी डाॅ. विपीन यांनी सर्व साहित्य व उपकरणे आलेले आहेत आपण लवकरच वाटप करू असे आश्वासन दिले होते. परंतु आज पुर्ण एक वर्ष झाले तरी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांना अद्याप एडिप योजणे अंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले नाहीत याचाच विसर जिल्हा प्रशासनाला पडल्यामुळे श्री साळवे यांनी हे साहित्य जिल्हा प्रशासनाने ता. ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक दिव्यांग दिनी वाटप करावे असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Hundreds of Divyangs from all over the district are waiting for literature Unemployed Divyang Kalyankruti Sangharsh Samiti nanded news