esakal | नांदेड : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पत्नीस दारु पिण्यास पैसे मागितले. परंतु घरगाडा चालवायला पैसे नसून दारु पिण्यास कुठून देऊ असे म्हणणाऱ्या पत्नीसोबत वाद घातला. एवढेच नाही तर तिच्या अंगावर राॅकेल टाकून जीवंत जाळले.

नांदेड : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दारु पिण्यास पैसे नाकारणाऱ्या पत्नीस जीवंत जाळून ठार मारणाऱ्या पतीस कंधार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर यांनी शुक्रवारी (ता. २७) जन्मठेप व रोख पाच हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पत्नीस दारु पिण्यास पैसे मागितले. परंतु घरगाडा चालवायला पैसे नसून दारु पिण्यास कुठून देऊ असे म्हणणाऱ्या पत्नीसोबत वाद घातला. एवढेच नाही तर तिच्या अंगावर राॅकेल टाकून जीवंत जाळले. भाजलेल्या अवस्थेत तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. ही माहिती पांडुरंग मुकुंदराव शिरसागर राहणार आडगाव तालुका लोहा यांनी सोनखेड पोलिस ठाण्यात आठ जानेवारी 2016 रोजी तक्रार दिली की त्यांचा भाऊ विठ्ठल क्षीरसागर यांनी त्याला फोन करुन माहिती दिली. की त्यांची बहीण चंद्रभागाबाई हिला तिचा नवरा माणिका धोंडीबा जोगदंड याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले आहे.

हेही वाचा - नांदेड : आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलावा- मंत्री उदय सामंत -

क्षीरसागर बंधूंनी आपल्या बहिणीला उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान 9 जानेवारी 2016 रोजी चंद्रभागाबाईचा मृत्यू झाला. सोनखेड पोलिसांनी याप्रकरणी मानिका धोंडीबा जोगदंड याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी श्री डोईबळे यांनी केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी माणिका धोंडीबा जोगदंडला अटक करुन त्याच्याविरुद्ध कंधार न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात चंद्रभागाबाईचा खून प्रकरणात बारा साक्षीदारांनी आपले जवाब न्यायालयाने नोंदवले. सरकारी वकील महेश कागणे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश अतूल सलगर यांनी माणिका जोगदंडला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.