esakal | नांदेड : आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलावा- मंत्री उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे एका हाॅटेलमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २७) बोलत होते

नांदेड : आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलावा- मंत्री उदय सामंत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारची दमदार वाटचाल सुरु आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना आवाहन केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे एका हाॅटेलमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २७) बोलत होते. या बैठकीस राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजीमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील,आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद तिडके बोंढारकर यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

येथे क्लिक करा -  शेतकरी जगला पाहिजे हीच आमची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी बोलताना उदय उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल योग्य रीतीने आणि दमदार सुरु आहे. कोरोनासारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळविणारे महाविकास आघाडीचे सरकार असलेला महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्याची ही वाटचाल भाजपला बघवत नसल्याने भाजपा बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आरोपाला अथवा टिकेला शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार भीक घालत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खोट बोल पण रेटून बोल ही भाजपाची प्रवृत्ती महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच ठाऊक झाल्याने आता होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारचा पराभव होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. आमदार सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याने या विजयात सर्वात मोठा सिंहाचा वाटा उचलण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी जोमाने काम करावे असे आवाहनही उदय सामंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा नांदेड : दुग्ध व्यवसायातून अल्पभुधारक शेतकऱ्याची भरारी, गुलाब पुष्पानेही दिला आधार

या  बैठकीत बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना सर्व ताकदीनिशी लढेल. निश्चितपणे आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातून त्यांना सर्वाधिक मते त्यांना मिळवून दिले जातील. असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीस माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार अनुसया खेडकर आदींची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी व्यक्त केले.