esakal | नांदेड : दिड वर्षांपासून फरार ग्रामसेवकाच्या कुंटूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नायगावसह कुंटूर व कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा अपहार प्रकरणी गुन्हे नोंद आहेत.

नांदेड : दिड वर्षांपासून फरार ग्रामसेवकाच्या कुंटूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : अपहाराच्या प्रकरणात नायगाव, कुंटूर व कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला आणि मागील दिड वर्षांपासून फरार असलेल्या भामटा  ग्रामसेवक शेषराव कौसल्ये याच्या कुंटूर पोलीसांनी मुसक्या अवळल्या आहेत. ता. ५ डिसेंबर रोजी मोठ्या शिताफीने कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

अतिशय वादग्रस्त कारकीर्द असलेला ग्रामसेवक शेषेराव कौसल्ये हा बनावटगीरी  आणि भामटेगीरी करण्यातही तरबेज आहे. नायगाव तालुक्यातील मोकासदरा येथे असतांना १२ लाखाच्या शौचालय अनुदानावर डल्ला मारला होता. एवढेच नव्हे तर तत्कालीन गटविकास अधिकारी उमाकांत रहाटीकर यांची बोगस सही करुन गडगा येथील बँकेतून रक्कम उचलण्याचाही प्रयत्न केला होता. पण शाखा व्यवस्थापकाचा सतर्कतेमुळे त्याचा त्यावेळी प्रयत्न फसला मात्र मोकासदरा येथील स्वच्छ भारत मिशन योजनेतील रक्कम चलून घेतल्या प्रकरणी निलंबित झाला होता तर गडगा येथील ग्रामपंचायतीच्या अर्थिक अपहार प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात कौसल्ये याच्यासह अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. एवढेच नव्हे तर  बिलोली तालुक्यातील डौर येथेही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील अपहार प्रकरणी कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यात तर बिलोली तालुक्यातील दुगाव येथेही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करतातच जवळपास ७ लाखाचा अपहार केल्या प्रकरणी बिलोलीचे तत्कालीन गटविकास अधिकारी उमाकांत रहाटीकर यांच्याच तक्रारीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. 

हेही वाचा -  मेडीकल कॉलेजसाठी आता ताकदीनिशी संघर्ष, परभणीकर संघर्ष समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

नायगावसह कुंटूर व कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी ग्रामसेवक शेषराव कौसल्ये हा मागील दिड वर्षांपासून तीनही पोलीस ठाणेदारांना चकमा देत फरार होता. तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा त्याच्या घरी व गावात जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो पोलीसांना सापडला नाही.  मात्र काल ता. ५ डिसेंबर रोजी तो उमरा ता.लोहा या आपल्या गावी येणार असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांना मिळाली. 

मिळालेल्या माहतीनुसाह पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले, जमादार  शेख अब्दूल बारी, पोलीस कर्मचारी उध्दव कदम, यांनी उमरा येरे कौसल्ये यास पकडण्यासाठी सापळा लावला होता. ता. ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान तो पोलीसाच्या सापळ्यात अडकला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुंटूर पोलीस करत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी नायगाव पोलिसांनी कसलाच तपास केला नाही की आरोपी सापडण्यासाठी कधीच शोध मोहीम राबवली नाही मात्र कुंटूर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले.

संपादन - प्रल्हाद कांबळे