नांदेड : सुशिक्षित बेरोजगार नवउद्योजकांचे व्याजासह कर्ज माफ करावे

प्रल्हाद कांबळे
Monday, 14 September 2020

विविध महामंडळे यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे, परंतु सध्याची परिस्थिती पहाता ते उद्योजक आजघडीला कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे शासनाच्या वतीने आम्हास मुभा मिळावी

नांदेड : आजघडीला नांदेड जिल्हा समवेत सर्वत्र लॉकडाऊन, कोरोनाची परिस्थिती उद्‌भवली आहे. त्यामुळे विविध नवउद्योजक तसेच काही सद्य परिस्थितीमध्ये कर्जदार यांनी विविध महामंडळे यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे, परंतु सध्याची परिस्थिती पहाता ते उद्योजक आजघडीला कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे शासनाच्या वतीने आम्हास मुभा मिळावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार नवउद्योजकांच्या वतीने होत आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार त्यासोबतच नवउद्योजक प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती प्रोग्राम व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती प्रोग्राम अंतर्गत त्यासोबतच विविध महामंडळे यांचेकडून नवउद्योग करण्यासाठी व्यवसाय उभारला होता. त्याकरिता कर्ज घेतले होते, परंतु मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये कोरोनाची परिस्थिती वाढल्यामुळे सर्वत्र व्यवसाय, उद्योग ठप्प आहेत. तरीसुद्धा संबंधित बॅंकेच्या वतीने वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे आजघडीला कुठल्याही स्वरूपाची बाजारपेठ उपलब्ध नाही. करिता बॅंकांनी नवउद्योजक कर्ज घेतलेले व संबंधित यांना व्याज आणि कर्ज माफ करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा बापरे! या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरून काढले ६७ काचांचे तुकडे -

भाजपा नवीन मोंढा नांदेड कार्यकारिणी घोषित

नांदेड : भारतीय जनता पार्टी महानगर नवीन मोंढा नांदेडच्या वतीने नुकतीच कार्यकारिणी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यावेळी प्रवीणभाऊ साले, नवल पोकर्णा यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

कामाजी सरोदे नवीन मोंढा मंडळ सरचिटणीस, संभाजी साखरे सरचिटणीस, अनिकेत गोकुळे उपाध्यक्ष, जयसिंग ठाकूर, सुशिल भिंगे, शांता काबरा, विलास दगडू सचिव, मनोज समुंदर, रामदास पाटील, धरमसिंग ठाकूर, बाळू शिंदे आदींची निवड यावेळी करण्यात आली आहे. खा. चिखलीकर, महानगराध्यक्ष साले यांनी वरील कार्यकारिणीला प्रमाणपत्र देऊन नियुक्त्या केल्या. कामाजी सरोदे यांचे आजपर्यंतचे सामाजिक, बहुजन, राजकीय कार्य पहाता त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवड केली आहे. या निवडीचे भाजपा महानगर नांदेड यांच्या वतीने कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Loans with interest to educated unemployed entrepreneurs should be waived nanded news