नांदेड : प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी मनदीपसिंघ सिलेदार यांची निवड

श्‍याम जाधव
Friday, 18 December 2020

राज्यातील 26 कॕडेट्स या संघांमध्ये सहभागी असून औरंगाबाद विभागातून पाच कॕडेट्सची निवड झाली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून मनदीपसिंघ सिलेदार हा एकमेव कॕडेट्स आहे.

नांदेड- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी एनसीसीच्या महाराष्ट्र कॉन्टीजनच्या संघामध्ये विष्णुपुरी, नांदेड येथील रहिवासी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेडचा विद्यार्थी मनदीपसिंघ जितेंद्रसिंघ सिलेदार यांची निवड झाली आहे. राज्यातील 26 कॕडेट्स या संघांमध्ये सहभागी असून औरंगाबाद विभागातून पाच कॕडेट्सची निवड झाली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून मनदीपसिंघ सिलेदार हा एकमेव कॕडेट्स आहे. 

राज्यातील सात एनसीसी ग्रुप मधील निवडक ५६ कॕडेट्स गेल्या महिन्याभरापासून पुण्यात निवड चाचणी शिबिरासाठी सहभागी झाले होते. त्यातील केवळ २६ कॅडेट्सची दिल्लीच्या राजपथ संचलनासाठी निवड झाली आहे. हे पथक ता. १८ डिसेंबर रोजी विमानाने दिल्लीला रवाना होणार आहे. 

हेही वाचानांदेड : मोबाईल शाॅपी फोडून, आपली मोबाईल शाॅपी चालविणारी टोळी जेरबंद, लाखोंचा ऐवज जप्त, भाग्यनगर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्रातील विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात आपले योगदान देत असतात. शिक्षण पूर्ण करीत असतांना हे कार्य करणे म्हणजे एक प्रकारची देश सेवाच आहे. त्यामुळे मनदीपसिंघ सिलेदार यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी मनदीपसिंघ सिलेदार यांची निवड झाल्याबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिवणीकर, एनसीसीचे डॉ. ए. यु. राठोड, डॉ. विठ्ठलसिंह परिहार, युनीवर्सल शाळेचे संचालक जितेंद्रसिंह पहाडिया, संतोष पावडे, गुरुदिपसिंघ चुंगीवाले, दर्शनसिंघ सुखमनी, मुन्नासिंघ कोल्हापूरे, धारोजी हंबर्डे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता इंजि. तानाजी हुस्सेकर, उपअभियंता अरुण धाकडे, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, अॕड. जयसिंग हंबर्डे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Mandeep Singh Siledar selected for Republic Day procession nanded news