esakal | नांदेड - गुरुवारी ५६ कोरोना बाधित रुग्णांची भर, १२ जणांची प्रकृती अतिगंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी ९०३ अहवालापैकी ८३८ निगेटिव्ह आले तर ५६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २१ हजार ९५९ एवढी झाली आहे.

नांदेड - गुरुवारी ५६ कोरोना बाधित रुग्णांची भर, १२ जणांची प्रकृती अतिगंभीर 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना संसर्गासंदर्भात बुधवारी (ता. १३) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. बुधवारी ९०३ अहवालापैकी ८३८ निगेटिव्ह आले तर ५६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २१ हजार ९५९ एवढी झाली आहे. यातील २० हजार ८१३ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३६७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५७८ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

हेही वाचा- नांदेड - गुरुवारी कोरोना प्रतिबंधक ‘लसी’चे १७ हजार डोस उपलब्ध होणार

५६ बाधित आढळले 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय दोन, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १४, देगलूर तीन, भोकर दहा, मुखेड आठ, माहूर एक, हदगाव एक, खासगी रुग्णालय सात असे एकूण ४६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात ३७, लोहा एक, हदगाव दोन, मुदखेड तीन, माहूर एक, कंधार पाच, बिलोली एक, उमरखेड एक, परभणी एक, मुखेड चार असे ५६ बाधित आढळले आहेत. 

हेही वाचा- नांदेड बसस्थानकातून सव्वा तीन लाखाचे दागिने चोरले ​

खासगी रुग्णालयात ४१ 

जिल्ह्यात ३६७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात २५, जिल्हा रुग्णालय २०, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) २९, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण १५१, मुखेड ११, हदगाव चार, महसूल कोविड केअर सेंटर २२, किनवट एक, देगलूर दहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५१, हैदराबाद येथे संदर्भीत दोन, खासगी रुग्णालयात ४१ आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २१ हजार ९५९ 
एकुण बरे - २० हजार ८१३ 
एकुण मृत्यू - ५७८ 
बुधवारी पॉझिटिव्ह - ५६ 
बुधवारी बरे - ४६ 
बुधवारी मृत्यू - शून्य 
प्रलंबित स्वॅब -३९६ 
सध्या उपचार सुरू - ३६७ 
अतिगंभीर रुग्ण -१२ 
 

loading image