esakal | नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे |Nanded Mayor Jayshree Pawade
sakal

बोलून बातमी शोधा

जयश्री पावडे महापौर

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदाच्या बुधवारी (ता. १३) झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री निलेश पावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता असून पाच वर्षात चार महापौर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कॉँग्रेसच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर महापौरपदाचा राजीनामा ता. ३० सष्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत दिला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी नवीन महापौर निवडीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार जयश्री पावडे यांचा काँग्रेस पक्षातर्फे एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड होणार हे निश्चित झाले होते. फक्त निवडीची औपचारिक घोषणा बाकी होती.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात बुधवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाइन सभेला सुरूवात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन होते. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, उपमहापौर मसूद खान, सभागृह नेता तथा स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, माजी सभापती बिरकले, नगरसेविका कविता मुळे आदींची उपस्थिती होती. महापौरपदासाठी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज आला आणि तो वैध ठरला.

त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. विपीन यांनी जाहीर केले. उपस्थितांनी महापौर पावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवडीनंतर महापौर कक्षात नूतन महापौर जयश्री पावडे आणि कॉँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष निलेश पावडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी महापौर शीला भवरे, मोहिनी येवनकर, अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सतिश देशमुख तरोडेकर, उमेश पवळे, माजी सभापती किशोर स्वामी, फारूख अली, अमितसिंह तेहरा, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, ज्येष्ठ नगरसेवक भानुसिंह रावत, संतोष मुळे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नांदेड-वाघाळा महापालिकेचे महापौर

१) सुधाकर पांढरे (शिवसेना) १९९७ - १९९८

२) मंगला निमकर (काँग्रेस) १९९८ - १९९९

३) गंगाधर मोरे (काँग्रेस) १९९९ - २००२

४) ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस) २००२ - २००५

५) शमीम बेगम अब्दुल हफीज (काँग्रेस) २००५ - २००७

६) बलवंतसिंग गाडीवाले (काँग्रेस) २००७ - २००९

७) प्रकाशचंद मुथा (काँग्रेस) २००९ - २०१०

८) अजयसिंह बिसेन (काँग्रेस) २०१० - २०१२

९) अब्दुल सत्तार (काँग्रेस) २०१२ - २०१५

१०) शैलजा स्वामी (काँग्रेस) २०१५ - २०१७

११) शीला भवरे (काँग्रेस) २०१७ - २०१९

१२) दीक्षा धबाले (काँग्रेस) २०१९ - २०२०

१३) मोहिनी येवनकर (काँग्रेस) २०२० - २०२१

१४) जयश्री पावडे (काँग्रेस) २०२१

loading image
go to top