esakal | नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सोमवारी (ता.२८) प्राप्त झालेल्या ६७० अहवालांपैकी ४९४ निगेटिव्ह, १५४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २२६ वर जाऊन पोहचली आहे.

नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील आठवडाभरापासून कोरोना किटची कमतरता भासू लागली आहे. कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असे वाटत असले तरी, पाच आॅक्टोबर पर्यंत कोरोना चाचणीच्या किट उपलब्ध होताच कोरोना चाचणीत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सोमवारी (ता.२८) प्राप्त झालेल्या ६७० अहवालांपैकी ४९४ निगेटिव्ह, १५४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २२६ वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

हेही वाचा- गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन करणार- एसपी प्रमोदकुमार शेवाळे ​

एक हजार ८४६ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

मराठवाड्यात औरंगाबाद व लातूर नंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नांदेड जिल्ह्यात आढळून आले आहेत. दहा दिवसापूर्वीच २० हजार कोरोना टेस्ट किटची मागणी करण्यात आली होती. परंतु किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने अत्यावश्यक तेवढ्याच चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी, सोमवारी सायंकाळपर्यंत प्रयोग शाळेकडून एक हजार ८४६ जणांचा अहवाल येणे बाकी होता. 

हेही वाचा- दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू ​

५० रुग्णांची प्रकृती गंभीर 

सोमवारी पोर्णिमानगर नांदेड महिला (वय ५४), नांदेड पुरुष (वय ५५), कंधार पुरुष (वय ९०) आणि उमरी पुरुष (वय ५२) अशा तीन पुरुषांचा व एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९४ इतकी झाली आहे. 
दहा दिवसाच्या औषधोपचानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय १४, विष्णुपुरी सासकीय महाविद्यालय १४, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि घरी असोलेशन मधील १४२, बिलोली- सात, धर्माबाद- सात, मुखेड- १६, लोहा- सात, अर्धापूर- तीन, किनवट- आठ, नायगाव- पाच, उमरी- तीन आणि खासगी रुग्णालयातील २५ असे २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ११ हजार ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तीन हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

याभागात आढळे बाधित रुग्ण

सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ९७, नांदेड ग्रामीण- एक, माहूर- दोन, किनवट- १२, कंधार- तीन, नायगाव- सहा, अर्धापूर-एक, धर्माबाद- तीन, भोकर- तीन, हदगाव- ११, उमरी- एक, मुखेड - चार, लोहा- एक, हिंगोली- चार, परभणी- दोन असे १५४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोना मीटर ः 

सोमवारी पॉझिटिव्ह- १५४ 
सोमवारी कोरोनामुक्त- २६३ 
सोमवारी मृत्यू- चार 
एकूण पॉझिटिव्ह - १५ हजार २२६ 
एकूण कोरोनामुक्त- ११ हजार ४९० 
एकूण मृत्यू-३९४ 
उपचार सुरू- तीन हजार २७४ 
गंभीर - ५०