नांदेड : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सायकल स्पर्धेत पठाण पहिले

file photo
file photo

नांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २१ वा वर्धापन दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १३) वृत्तपत्र विक्रेते व लाईनवर पेपर वाटणाऱ्या मुलांसाठी आयोजित सायकल स्पर्धेत जुनेद पठाण पहिले आले. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शेड व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी यावेळी दिले.

मंगळवारी (ता. १३) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील शिवमंदिर चैतन्यनगर ते सांगवी नाका- पुन्हा शिवमंदिर या मार्गावर आयोजित या सायकल स्पर्धेला महापौर मोहिनी येवनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, विजय जोशी, विजय येवनकर, संतोष पांडागळे, गजानन काळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार, प्रदीप नागापूरकर, सुभाष लोणे, कृष्णा उमरीकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक प्रतिनिधी सखाराम तुप्पेकर, सदाशिव गच्चे, गणपत बनसोडे, गोविंद कंधारे, राजकुमार बगाटे, सुधाकर काकडे, बाळासाहेब टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत ७६ स्पर्धकांनी सहभाग

या स्पर्धेत ७६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पहिला विजेता ठरला जुनेद पठाण. दुसरा विजेता ठरला मारोती जाधव, तिसरा विजेता ठरला तेजस हिंगोले तर उत्तेजनार्थ पात्र ठरले दीपक तिडके व संघरत्न बुक्तरे. या विजेत्यांचे महापौर येवनकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर येवनकर म्हणाल्या की, मी महापौर होताच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि आ. अमर राजूरकर यांनी स्वत:हून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सोयी सुविधायुक्त शेडची उभारणी लवकरात लवकर करा असे सांगितले. त्यानुसार मनपा यंत्रणा कामाला लागली आहे. लवकरच हे शेड उभारले जाणार आहे.अन्य काही समस्या असतील आणि मनपाच्या कक्षेतील असतील तर आपण त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त

या स्पर्धेचे प्रायोजक सत्यप्रभाच्या वतीने सर्व स्पर्धकांना मोफत टी शर्ट वाटप करण्यात आले. या विजेत्यांना १५ ऑक्टोबर रोजी वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरित केले जाणार आहे. सायकल प्रशिक्षक अजय उर्फ शिनू पवार, प्रवीण कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले.

यांनी परिश्रम घेतले

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ, सरदारसिंह चौहान, अवधूत सावळे, बाबु जल्देवार, संदीप कटकमवार, चेतन चौधरी, व्यंकटेश आनलदास, खय्यूम पठाण, बालाजी चंदेल, गजानन पवार, विनायक आंधे, लखन नरवाडे, भागवत गायकवाड, रामेश्वर पवार, नीळकंठ सोनटक्के,सतीश कदम,बालाजी सुताडे,राज ठाकूर,बाबुराव थोरात, राजेश्वर लोकडे, संजय पाटील, राजू पवार, गजानन पवार, शुभम पवार, अनुप ठाकुर, प्रशांत वाघमारे नायगाव, सुदर्शन कऱ्हाळे निवघा बाजार, सुनील व्यवहारे हदगाव, हबीब उबेद देगलूर, पांडुरंग रहाटकर लोहा, केशव रापतवार बाऱ्हाळी यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणेने सहकार्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com