

Kandhar Forest Guard Research Gives Nanded Seven Leaf Bilva Tree International Recognition on the Global Botanical Map
sakal
हफीज घडीवाला कंधार : वनसेवेतील कर्तव्य बजावताना वनस्पतीशास्त्राचा ध्यास घेतलेले कंधारचे भूमिपुत्र वनरक्षक शिवसांब घोडके यांच्या संशोधनामुळे नांदेडच्या जैवविविधतेला वेगळी वैज्ञानिक ओळख मिळाली आहे. नांदेड जिल्ह्याच्या मातीत आढळलेल्या बेलवृक्षाच्या दुर्मिळ सातपानी स्वरूपाची नोंद आता जागतिक वनस्पतीशास्त्रीय पटलावर झाली आहे.