नांदेडला दिवसभरात १११ पॉझिटिव्ह तर १७१ कोरोनामुक्त 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 20 October 2020

नांदेड जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी १७१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ३०१ एवढी झाली आहे. दरम्यान, उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये कुंटुंर (ता. नायगाव) पुरूष (वय ५५) आणि सावरगाव कला (ता. उमरी) पुरूष (वय ७०) यांचा समावेश आहे. सध्या एक हजार ३८१ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार १११ पॉझिटिव्ह आढळून आले तर १७१ जणांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात दोन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तसेच सध्या एक हजार ३८१ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी १७१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ३०१ एवढी झाली आहे. दरम्यान, उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये कुंटुंर (ता. नायगाव) पुरूष (वय ५५) आणि सावरगाव कला (ता. उमरी) पुरूष (वय ७०) यांचा समावेश आहे. सध्या एक हजार ३८१ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

हेही वाचा - नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष

दिवसभरात १११ पॉझिटिव्ह
मंगळवारी सायंकाळी एक हजार १५४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २८ अहवाल निगेटिव्ह आले तर १११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १११ अहवालापैकी २० आरटीपीसीआर तर ९१ अहवाल ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे आले आहेत. आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या १८ हजार २९१ झाली आहे. मंगळवारी आढळलेल्या १११ रुग्णांमध्ये नांदेड महापालिका, नांदेड ग्रामिण, हदगाव, उमरी, मुखेड, बिलोली, नायगाव, कंधार, लोहा, किनवट, देगलूर, धर्माबाद, मुखेड तसेच यवतमाळ व हिंगोली येथील रुग्णांचा समावेश आहे.  

४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७८, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे ८६ तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये ९० खाटा शिल्लक आहेत. खासगी रुग्णालयात १३१ रुग्ण दाखल आहेत तर लातूरला एक आणि हैदराबाद येथे दोन रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत. तसेच ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - वसुलीसाठी बँकांचा एकही माणूस शेतकऱ्यांकडे फिरकला नाही पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण स्वॅब - एक लाख ६४४
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ७९ हजार सहा
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १८ हजार २९१
 • आज मंगळवारी पॉझिटिव्ह - १११
 • रुग्णालयातून सुटी दिलेले एकूण रुग्ण - १६ हजार ३०१
 • आज मंगळवारी सुटी दिलेले रुग्ण - १७१
 • एकूण मृत्यू - ४९०
 • आज मंगळवारी मृत्यू - दोन
 • आज मंगळवारी स्वॅब तपासणी प्रलंबित - ४७९
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरू - एक हजार ३८१
 • सध्या अतिगंभीर रुग्ण - ४५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded received 111 positive and 171 corona free in a day, Nanded news