नांदेडला मंगळवारी २२५ कोरोनामुक्त तर २१६ पॉझिटिव्ह  

अभय कुळकजाईकर
Tuesday, 29 September 2020

नांदेडला मंगळवारी (ता. २९ सष्टेंबर) दिवसभरात २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर दिवसभरात २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले आहेत. दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला आहे तर सध्या उपचार घेत असलेल्या तीन हजार २४२ रुग्णांपैकी ३२ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

नांदेड - गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून कोरोनाग्रस्तांचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी (ता. २९) प्राप्त झालेल्या अहवालात २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, २२५ रुग्णांना औषधोपचारानंतर मंगळवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तीन हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३२ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. दिवसभरात चार जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ९८६ अहवालापैकी ७४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ४४२ झाली आहे. आज आढळून आलेल्या २१६ रुग्णांमध्ये आरटीपीसीआरद्वारे ६८ तर ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे १४८ जणांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरासह नांदेड ग्रामिण, अर्धापूर, देगलूर, कंधार, हदगाव, धर्माबाद, मुखेड, बिलोली, किनवट, भोकर, मुदखेड, उमरी, लोहा, नायगाव या तालुक्यांसह परभणी, हिंगोली, वर्धा, निर्मल येथील रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

आत्तापर्यंत ३९८ जणांचा मृत्यू
मंगळवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये नांदेडच्या कल्याणनगर पुरूष (वय ७०), जुना मोंढा पुरूष (वय ७२), सिडको महिला (वय ७५) आणि कुंटुंर (ता. नायगाव) पुरूष (वय ६७) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत उपचार सुरू असताना ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण घेतलेले स्वॅब - ८२ हजार १८
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ६२ हजार ३२७
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १५ हजार ४४२
 • मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण - २१६
 • रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - ११ हजार ७१५
 • मंगळवारी सुटी दिलेले रुग्ण - २२५
 • एकूण मृत्यू संख्या - ३९८
 • मंगळवारी मृत्यू - चार
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरू - तीन हजार २४२
 • सध्या अतिगंभीर रुग्ण - ३२  
 • प्रलंबित स्वॅब संख्या - एक हजार ८४४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded released 225 corona on Tuesday and 216 positive, Nanded news