esakal | नांदेड - सकाळ इम्प्ॅक्ट ; प्रलंबित अहवाल संख्येत घट, रविवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त; सहा बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी (ता. चार) ८७४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७३५ निगेटिव्ह, १२२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ३२१ वर जाऊन पोहचली आहे.

नांदेड - सकाळ इम्प्ॅक्ट ; प्रलंबित अहवाल संख्येत घट, रविवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त; सहा बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड -  मराठवाड्यात औरंगाबाद नंतर नांदेड शहरात दोन कोरोना चाचणी लॅब आहेत. असे असताना देखील तपासणीसाठी घेतलेले एक हजारापेक्षा अधिक स्वॅब प्रलंबित ठेवण्यात येत होते. ‘सकाळ’ने हे प्रकरण लावून धरल्याने रविवारी (ता. चार) प्राप्त झालेल्या अहवालात केवळ ४३६ अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. 

शनिवारी (ता. तीन) एक हजार ३९१ स्वॅब अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी रविवारी (ता. चार) ८७४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७३५ निगेटिव्ह, १२२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ३२१ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या २४ तासात फंकज नगर नांदेड महिला (वय ८२), शामनगर नांदेड पुरुष (वय ४३), शिराढोण कंधार पुरुष (वय ६०), लेबर कॉलनी नांदेड महिला (वय ५५), हदगाव पुरुष (वय ५२), वर्ताळा (ता.मुखेड) पुरुष (वय ७५) अशा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४२६ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेड - हाथरस प्रकरणी मंगळवारी वंचितचे मानवी साखळी आंदोलन ​

५५ बाधिकांची प्रकृती गंभीर

रविवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय १३, विष्णुपुरी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय १५, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन मधील १२९, बिलोली- तीन, भोकर- सहा, हदगाव - दोन, माहूर - एक, धर्माबाद- आठ, मुखेड- ३०, अर्धापूर- पाच, हिमायतनगर- एक, कंधार- एक, किनवट- पाच, लोहा- १७ व खासगी रुग्णालयातील २७ असे २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. आतापर्यंत १२ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या दोन हजार ९८७ कोरोना बाधितावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५५ बाधिकांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचले पाहिजे- गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार प्रवाशांना दिलासा ​

या भागात कोरोना बाधित आढळले

शनिवारच्या आरटीपीसीआर व अँनटीजन टेस्ट किट तपासणीत नांदेड वाघाळा महापालिका हदीत- ६९, नांदेड ग्रामीण- १५, किनवट- चार, कंधार- तीन, धर्माबाद- सहा, मुदखेड- एक, हादगाव- चार, नायगाव- पाच, उमरी- एक, हिमायतनगर- एक, माहूर- एक, लोहा- दोन, यवतमाळ- दोन, नागपूर- एक, हिंगोली- तीन, परभणी- तीन, जालना- एक असे १२२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

रविवारी पॉझिटिव्ह -१२२ 
रविवारी कोरोनामुक्त- २६३ 
रविवारी मृत्यू- सहा 
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या- १६ हजार ३२१ 
एकूण कोरोनामुक्त- १२ हजार ८०८ 
एकूण मृत्यू- ४२६ 
उपचार सुरू - दोन हजार ९८७ 
प्रकृती गंभीर - ५५