Nanded Road Accidents : शेळगावजवळ दुचाकी अपघातात पती-पत्नीचा मृत्यू; बिलोलीतील चिद्रावार दांपत्यावर काळाचा घाला

Husband Loses Life During Treatment After Crash : नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत बिलोलीतील पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर हदगावजवळ जीप उलटून नऊ भाविक जखमी झाले.
Nanded Road Accidents

Nanded Road Accidents

esakal

Updated on: 

कुंडलवाडी (जि. नांदेड) : कुंडलवाडी-धर्माबाद मार्गावरील शेळगावजवळ गुरुवारी (ता. २४) झालेल्या भीषण दुचाकी अपघातात बिलोली येथील पती-पत्नी ठार झाले. कुंडलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेळगावजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. देशमुखनगर, बिलोली येथील पती गंगाधर विजय चिद्रावार (वय ४०) आणि पत्नी पुष्पा ऊर्फ सुमलता चिद्रावार (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत.

बिलोलीहून चिद्रावार दांपत्य दुचाकी (एमएच २६ वाय १६८६) वरून धर्माबादकडे जात होते. शेळगावजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघातात पुष्पा ऊर्फ सुमलता चिद्रावार यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी गंगाधर चिद्रावार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

Nanded Road Accidents
जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

अपघात नेमका कसा व कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जीप अपघात नऊ भाविक जखमी तामसा(जि. नांदेड) (बातमीदार) : हिमायतनगर तालुक्यातील किरमगाव येथून हिंगोली येथे गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जीपला मानवाडी फाटा (ता. हदगाव) येथे गुरुवारी (ता. २४) अपघात झाला.

या अपघातात दोन कुटुंबांतील नऊ जण जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मनमदे आणि शिंदे कुटुंबीय हे एकमेकांचे नातेवाइक असून, गणपती दर्शनासाठी हिंगोलीकडे कार (एमएच १२-एनई०१०३) ने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील संत गोरोबाकाका नर्सरी परिसरात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात नऊ जण जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी उलटलेली जीप सरळ करून जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nanded Road Accidents
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप स्वामी, डॉ. शुभांगी माने व डॉ. पोटे यांनी प्रथमोपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. तिघांना किरकोळ दुखापत झाली असून, सहा जण गंभीर आहेत. हदगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. अपघातातील जखमींची नावे या अपघातात विलास रामराव मनमदे (वय २६), दुर्गा विलास मनमदे (वय २१), शिवराज विलास मनमदे (वय २४), राजनंदनी दत्ता शिंदे (वय १६), पद्मावती दत्ता शिंदे (वय ४०), समर्थ दत्ता शिंदे (वय १४), शिवकन्या दत्ता शिंदे (वय ६), नम्रता दत्ता शिंदे (वय १७) आणि दत्ता किशन शिंदे (वय ४५) हे जखमी झाले आहेत. यातील सहा जण गंभीर जखमी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com