नांदेड - बुधवारी सहा बाधितांचा मृत्यू, एक हजार १६५ अहवाल पॉझिटिव्ह 

file Photo
file Photo

नांदेड - जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) प्राप्त झालेल्या अहवालात ४८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यासोबतच नव्याने एक हजार १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

बुधवारी साईबाबा मंदीर नांदेड पुरुष (वय ७५), चाभरा तालुका अर्धापूर पुरुष (वय ४५), चव्हाण वाडी पुरुष (वय ६०) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर, साईनगर नांदेड महिला (वय ७०), हदगाव पुरुष (वय ६४), माहूर पुरुष (वय ७१) या तीन बाधितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी या सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना आजाराने जिल्ह्यातील एकुण ६७४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात ४८६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतार्यंत २६ हजार ७७९ कोरोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात केली आहे. 

बाधितांची एकुण संख्या ३५ हजार ५०२

बुधवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ७२६, नांदेड ग्रामीण - ४०, अर्धापूर -२७, नायगाव - ३२, भोकर - ३०, उमरी- पाच , बिलोली - ३३, कंधार - १०, मुदखेड -२७ , लोहा-५३ , धर्माबाद - ३४, हिमायतनगर -११, किनवट -३०, हदगाव - ५०, देगलूर - १८, मुखेड -१५, माहूर -आठ, यवतमाळ- पाच, परभणी- आठ, तेलंगणा - एक, हिंगोली- दोन असे एक हजार १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३५ हजार ५०२ इतकी झाली आहे.सध्या सात हजार ८१६ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

तीन शासकीय रुग्णालयात ६९ खाटा उपलब्ध

त्यापैकी ६२ कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ४१० स्वॅबची तपासणी सुरु होती. 
बुधवारी सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नऊ, जिल्हा शासकीय रुग्णालयात २० आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालयात ४० खाटा उपलब्ध होत्या. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - ३५ हजार ५०२ 
एकुण बरे - २६ हजार ८९ 
एकुण मृत्यू - ६७४ 
बुधवारी पॉझिटिव्ह - एक हजार १६५ 
बुधवारी बरे - ४८६ 
बुधवारी मृत्यू - सहा 
उपचार सुरु - सात हजार ८१६ 
गंभीर रुग्ण - ६२ 
स्वॅब प्रलंबित - ४१० 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com