MSRTC : शासनाच्या योजनांच्या सवलत दरामुळे लालपरी प्रवाश्‍यांच्या गर्दीने ओव्हर फ्लो

महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची वाढली गर्दी; लाखोंच्या घरात गेली आकडेवारी
nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtcesakal

नांदेड : गेल्या महिन्याभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. यात शासनाच्या योजनांच्या सवलत दरामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या गर्दीने बस ओव्हरफ्लो होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारात मिळून ता. एक ते ता. २१ मे दरम्यान साडेआठ लाख महिलांनी, दीड लाख ज्येष्ठ नागरिकांनी तर जवळपास आठ लाख ७५ वर्षावरील ज्येष्ठांनी प्रवास केला आहे.

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
Mumbai Crime : "मी लवकरच मुंबईला बॉम्बने उडवणार" मुंबई पोलिसांना धमकी, यंत्रणा सतर्क

सद्यस्थितीत मे महिन्याची उन्हाळ्याची सुटी तसेच लग्न आणि इतर प्रसंगामुळे प्रवाशांच्या गर्दीचा हंगाम असून त्यात ज्येष्ठ नागरिक व महिला यांना राज्य परिवहन बसच्या प्रवासात अर्धे तिकीट असल्याने या काळात प्रवाशांची गर्दी कमालीची वाढली आहे.

लग्न असो वा इतर कार्यक्रम, यासाठी प्रत्येक परिवारात आता कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना संधी दिली जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा बसमध्ये जाण्याची धडपड वाढत आहे. त्यामुळे दररोज महामंडळाच्या स्थानिक तथा लांब पल्ल्याच्या बसमध्ये मोठी गर्दी होत आहे.

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
MSRTC News : मालेगावची बस गुजरातच्या जंगलात बंद पडली!

शासनाच्या वतीने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट व आता नव्याने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरु केली आहे. त्यामुळे गर्दी आणखी वाढली आहे.

परंतु, बस फेऱ्या वाढवल्या नसल्याने येथून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसमध्ये गर्दी असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने लक्ष देऊन बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

नांदेड विभागाची ता. २१ मे पर्यंतची आकडेवारी....

  • महिला सन्मान योजना ः आठ लाख ५५ हजार १४३ महिला ः दोन कोटी ९७ लाख १४ हजार १६३ रुपये

  • ज्येष्ठ नागरिक योजना ः एक लाख ५३ हजार ७१ नागरिक ः ८५ लाख ६८ हजार ७२१ रुपये

  • अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास ः सात लाख ९४ हजार ५३२ नागरिक ः चार कोटी ३५ लाख ७९ हजार १४७

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
Nanded : धक्कादायक! चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह...

एसटी महामंडळातर्फे असलेल्या विविध योजनांचा फायदा प्रवाशांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर एसटी बसचा प्रवास सुरक्षित असल्यामुळे प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करावा.

- कमलेश भारती, विभागीय वाहतुक अधिकारी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com