esakal | नांदेड : बारसगावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाी कडक अंमलबजावणी

बोलून बातमी शोधा

बारसगाव फवारणी
नांदेड : बारसगावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाी कडक अंमलबजावणी
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : बारसगावात कोरोना रुग्णाच्या संखेत वाढ झाल्याने प्रशासन, आरोग्य विभाग व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या पुढाकारातून गावात फवारणी करण्यात आली.

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या महामारीचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासन व नागरिक एकवटले आहे. तहसीलदार सुनीत नरहीरे यांनी बारसगांवला भेट दिली. गावातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत बारसगांव व आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनाची पाहणी केली.

हेही वाचा - नांदेडकरांनो सावधान : रुग्णवाहिकेतून रुग्णाप्रमाणेच ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक; कोरोनाची दाहकता

गावांत फवारणी करणे, चाचणी करणे, जे कोरोना बाधीत आहेत त्यांची काळजी घेणे व संपूर्ण गांव दहा दिवसासाठी लाॅकडाऊन करणे, मास्क वापरणे सक्तीचे करणे आदी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. विना मास्क फिरणा-यांना दोनशे रुपयांचा दंड ग्रामपंचायत लावण्यात येणार आहे. गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विद्या झिने, जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांनी सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत व गावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी मंडळ अधिकारी संजय खिलारे, एस. पी. गोखले, मुंढकर आरोग्य सेवक राऊत, तलाठी श्री. मोठे, ग्रामसेवक श्री. कोलपवार, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक शिवाजीराव बारसे, उत्तमराव बारसे, बालाजी गोदरे, एकनाथ मोगरकर सदस्य ग्रामपंचायत, अमोल बारसे, शंकरराव बारसे तंटामुक्त समिती अध्यक्ष, अंबादास देशपांडे,रामराव भालेराव, रघुनाथ बारसे, बाबुराव नाईकवाडे, अशा वर्कर, अगणवाडी सेविका यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे