नांदेडला गोदावरी नदीकाठी ६२ तराफे जाळून केले नष्ट 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 14 October 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अवैधरित्या आणि बेकायदेशिररित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नांदेड तालुक्‍यातील धनेगाव, मरघाट, जूना पूल येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्‍या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयाचे पथकाने सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाईस सुरुवात केली. 

नांदेड - अवैधरित्या आणि बेकायदेशिररित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिलेल्या आदेशानुसार कडक कारवाई करण्यात येत आहे. नांदेड तहसीलच्या पथकाने बुधवारी (ता. १४) दुपारी कारवाई केली. गोदावरी नदीवरील धनेगाव, मरघाट, जूना पूल आदी भागात जाऊन धडक कारवाई करत ६२ तराफे जप्त केले आणि ते जाळून नष्ट केले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अवैधरित्या आणि बेकायदेशिररित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नांदेड तालुक्‍यातील धनेगाव, मरघाट, जूना पूल येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्‍या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयाचे पथकाने सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाईस सुरुवात केली. 

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

पथकात यांचा होता सहभाग 
जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक तहसील अंतर्गत पथक स्थापण्यात आले असून त्याद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे. नांदेड शहरात जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथक प्रमुख नायब तहसीलदार मुगाजी काकडे, नांदेड ग्रामिण ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, गोविंद खैरे व इतर पोलीस कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, अनिल धुळगंडे, के. एम. नागरवाड, गजानन नांदेडकर, तलाठी खुशाल घुगे, सय्यद मोहसीन, सचिन नरवाडे, उमाकांत भांगे, मंगेश वांगीकर, आकाश कांबळे, राहुल चव्‍हाण यांनी धनेगाव, मरघाट, जूना पूल येथे जाऊन कारवाई केली. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी ; थॅलेसिमीयाचे रुग्ण रक्त तुटवड्याने त्रस्त

तराफे गोळा करून जाळले
गोदावरी नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे वाहून आलेली वाळू तराफ्याच्या साह्याने गोळा करण्याचे काम वाळू तस्कारांकडून सुरू होते. दिवस उजाडला की वाळू तस्करांचे गोदावरी नदीकाठी वाळू गोळा करण्यास सुरूवात होते. याबाबत अनेकदा कारवाई करूनही वाळू उपसा करण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नांदेड तहसीलच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरुन तराफे खेचून एकूण ६२ तराफे गोळा केले आणि नंतर ते मजूराचे साह्याने जाळून नष्‍ट केले. नदीपात्रात असलेले तराफे काढून घ्‍यावेत तसेच अवैध वाळू उपसाविरुध्‍दची मोहीम आणखी तीव्र करण्‍यात येवून दोषींवर फौजदारी कार्यवाही करण्‍यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण व तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded tahsil was destroyed by burning 62 rafts along Godavari river, Nanded news