नांदेड : महापालिकेतर्फे करवसुलीची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Municipal Corporation

नांदेड : महापालिकेतर्फे करवसुलीची मोहीम

नांदेड ः नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने मालमत्ता कराची थकबाकी आणि चालू वर्षाची कराची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नाही तर त्यांच्याविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मालमत्ता करासह इतर करांची वसुली करताना महापालिकेने कडक कार्यवाही केली नाही. यंदाच्या वर्षी मात्र, नोव्हेंबर महिन्यापासूनच कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी याबाबत नुकतीच एक बैठक घेऊन आढावा घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शुभम क्यातमवार, उपायुक्त तथा मुल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी अजितपालसिंघ संधू यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख, वसुली पर्यवेक्षक व लिपिक उपस्थित होते. कर वसुली करण्यासाठी मालमत्ताधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून जे नियमित कराचा भरणा करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. लहाने यांनी दिल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयातंर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पथकाच्या वतीने कार्यवाही करण्यास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

दरम्यान, मालमत्ताधारकांनी मालमत्ता तसेच इतर कर वसुली संदर्भात सवलत देण्याची त्याचबरोबर कराचा भरणा करण्यासाठी टप्पे पाडून किंवा मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

"महापालिकेच्या वतीने सहाही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पथकाच्या वतीने करवसुली करण्यास सुरूवात केली आहे. सर्व मालमत्ताधारकांनी चालू तसेच थकीत कराचा भरणा वेळेवर करून महापालिकेस सहकार्य करावे."

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त.

"मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा वेळेवर करावा. जे सहकार्य करणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करणे, पाणीपुरवठा तसेच मलनिस्सारण खंडीत करण्याची कार्यवाही पथकामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी आपल्याकडील विविध करांची थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे."

- अजितपालसिंघ संधू, उपायुक्त.

loading image
go to top