Nanded : गांजा प्रकरणातील दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded
Nanded : गांजा प्रकरणातील दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nanded : गांजा प्रकरणातील दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

बिलोली (जि.नांदेड) : नायगाव (Naigaon) तालुक्यातील मांजरम येथे जप्त करण्यात आलेल्या कोट्यावधींच्या गांजा प्रकरणातील दोन संशयित आरोपींना गुरुवारी (ता.१८) बिलोली (Biloli) येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.आर. देशपांडे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १५ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातून गांजा भरून येणारा ट्रक अंमलीपदार्थ नियंत्रकच्या (एनसीबी) (NCB) मुंबईतील काही अधिकाऱ्यांनी सापळा रचून नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांजरम येथून ताब्यात घेतला. या प्रकरणातील संशयित आरोपी ट्रक चालक व मालक गोकुळ राजपूत आणि सुनील यादव महाजन यांना अटक करून नायगाव येथील न्यायालयात हजर केले असता (Nanded) त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. राज्यामध्ये अंमली पदार्थाचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील या प्रकरणाला आता वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.

हेही वाचा: Pune : बारामतीत ट्रकने दुचाकीवरील पती-पत्नीला चिरडले, दोघेही ठार

अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून गांजा वाहून नेणारा ट्रकचे पासिंग नांदेडचे आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामधील काही बड्या लोकांचा यात हात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपी ट्रक चालक व मालक आला. गुरुवारी बिलोली येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. एनसीबीचे तपास अधिकारी विठ्ठल पवार यांनी जिल्हा न्यायाधीश डी.आर.देशपांडे त्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती सादर करून आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात ठेवण्याची मागणी केली. न्यायालयाने संपूर्ण माहिती जाणून घेऊन व या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना चौदा दिवस म्हणजे दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड संदीप कुंडलवाडीकर यांनी आरोपीच्या वतीने अँड निलेश देशपांडे यांनी बाजू मांडली होती.

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठी फ्युचर्स मार्केटचे 'हे' 2 शेअर्स देतील मजबूत कमाई

सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात तस्करी

बिलोली हा तालुका तेलंगणा सीमेलगत असल्याने सीमेलगत मार्गावरून अंमली पदार्थांसह अनेक अवैध बाबींची तस्करी नांदेड जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्रात होत असते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः अकरा कोटींपेक्षा अधिक रकमेचा गांजा पकडला आहे. सीमावर्ती भागातून गुटखा, अन्य अंमली पदार्थ, स्वस्त धान्य दुकानातील माल व रसायनमिश्रीत ताडी, बनावट पदार्थांची तस्करी होत असते. याकडे मात्र संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध बाबींना खतपाणी घालण्यात येत आहे.

loading image
go to top