esakal | नांदेड : का वाढत आहेत विवाहितांच्या छळांच्या घटना ? 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या त्रासाला कंटाळून पिडीत महिलांच्या तक्रारीवरुन उमरी आणि वजिराबाद पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : का वाढत आहेत विवाहितांच्या छळांच्या घटना ? 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लग्नात मान- सन्मान मिळाला नाही असे म्हणून एका महिलेचा तर वडिलाच्या नावावर असलेली दोन एकर शेती माझ्या नावावर कर असे म्हणून दुसऱ्या एका विवाहितेचा सासरच्या मंडळीनी छळ केला. या त्रासाला कंटाळून पिडीत महिलांच्या तक्रारीवरुन उमरी आणि वजिराबाद पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उमरी (जिल्हा नांदेड) येथील एका विवाहितेला तिच्या सासरी लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. मात्र त्यानंतर तिचा किरकोळ कारणावरुन अपमान करुन त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच नविन ट्रक घेण्यासाठी एक लाख रुपये व वडिलाच्या नावे असलेल्या जमिनीपैकी दोन एकर शेताची मागणी सुरु केली. ता. चार आॅगस्ट २०२० रोजी हा त्रास अधिकच वाढत गेला. सासरी होणारा त्रास पिडीत विवाहितेने आपल्या माहेरी सांगितला. तिच्या माहेरच्या मंडळीनी सासरच्या लोकांना समजावून सांगितले. परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्याने एवढी रक्कम ते देऊ शकत नव्हते. त्यामुळे पिडीत विवाहिता त्रास सहन करुन लागली. मात्र शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून तिने उमरी पोलिस ठाणे गाठून आपली तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार श्री. कदम करत आहेत. 

हेही वाचा -  सावधान : नांदेडमध्ये एका अधिकाऱ्याला दोन लाखाचा ऑनलाईन गंडा

नांदेडमध्येही विवाहितेचा छळ

नांदेड येथील एका युवतीचे लग्न बीड येथील तरुणाशी झाले होते. लग्नांतर तिला काही दिलवस चांगले नांदवले. दरम्यानच्या तिला त्रास दणे सुरु केले. ता. १० मार्च २०१९ ते ता. पाच आॅगस्ट २०२० मध्ये बीड व नांदेड येथे त्रास देणे सुरु केले. तुझ्या लग्नात आम्हाला भांडी, भेटवस्तु आणि मान- सन्मान मिळाला नाही, तसेच तुझ्या वडिलांनी हुंडा जास्त दिला नाही. तु आता माहेराहून १५ लाख रुपये घेउन म्हणून तिच्या पतीने त्रास देणे सुरु केले. तिचा मानसिक व शारिरीक छळ करुन पती वेळप्रसंगी तिला मारहाण करत असे. पैसे नाही आणली तर तुला ठार मारुन टाकु अशी धमकी देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून पिडीत विवाहितेने आपल्या माहेरी येऊन वजिराबाद पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस नाईक वाजीद करत आहे.